-->

Happy Diwali

Happy Diwali
जिल्ह्यात "पोक्सो" घटनांची मालीका सुरूच

जिल्ह्यात "पोक्सो" घटनांची मालीका सुरूच

  • तिन्ही संतापजनक घटनेत पिडीता अल्पवयीन मुली ,
  • दोन्ही घटनेत इंस्ट्राग्रामवर ओळख 
  • साकोली, मोहाडी व अड्याळ पोलीसांचा तपास जलदगतीने सुरू  

संजीव भांबोरे

भंडारा :- ०९ जुलैला साकोलीत नामांकित डॉक्टरतर्फे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्याची संतापजनक घटना समोर आली. फरार डॉक्टरचा साकोली पोलीस कसून शोध घेत असून त्यांनी आता मध्यप्रदेश गाठले आहे. यावर निवेदनांची मालिका सुरू असतांनाच १२ जुलैला अड्याळ येथील अवघ्या १५ वर्षीय मुलीला आरोपीने फूस लावून पळविले व अत्याचार केला. हि सुद्धा घटना ताजी असता काल १५ जुलैला मोहाडीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा संतप्त प्रकार घडला. याने संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला असून पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून भंडारा, साकोली, मोहाडी व अड्याळ पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने पुढे नेत आहेत. 

 साकोली शहरात ०९ जुलैला प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफी कक्षात एका दलित व अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले. यातील आरोपी फरार असून साकोली पोलीस त्याच्या शोधासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश पर्यंत पोचली आहे. याबाबद साकोलीत निवेदनाची मालिका सुरू असतांनाच १२ जुलैला अड्याळ येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीशी इंस्ट्राग्रामवर ओळख झालेला आरोपी आरीफ अंकुश मेश्राम यांने मुलीला आपल्या कवडशी गावी फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केला. यातील आरोपीला पोक्सो अंतर्गत अटक करून पोलीस उच्चस्तरीय चौकशी करीत आहेत. ही घटना होत नाही तोच काल मंगळवारी १५ जुलैला मोहाडीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत चार जणांनी संगनमत करून सामुहिक अत्याचार उघडकीस आला. यात तीन तरूण व एक मदत करणारी २२ वर्षीय महिला आहे. यात ती महिला व दोन आरोपी निकुंज मेहर २३, प्रणय पाटील २३ या तरूणांना मोहाडी पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली व यातील एक आरोपी बाल्या बोंद्रे ४५ हा फरार असून त्याच्या शोधासाठी मोहाडी व भंडारा पोलीस पथक रवाना झाले आहेत. या सुद्धा घटनेत मोहाडी पोलीसांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रतिबंधक कलम ६४ (२), आय ७० (२), बी.एन.एस ४, ५, ६, पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यातील दोन्ही घटनेत सोशल मिडीयातून इंस्ट्राग्रामवर ओळख करून अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार झाल्याचे समजले आहे. म्हणजेच लहान वयात आईवडील मुलामुलींना स्मार्ट फोन मोबाईल घेऊन देण्याचा हा गंभीर परीणाम होत आहे असे जनतेने मत व्यक्त केले आहे. या साकोली, अड्याळ व मोहाडी तिन्ही संतापजनक घटनेवर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. नुरूल हसन यांच्या एक्शन कारवाई आदेशानुसार साकोली पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, अड्याळ पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व मोहाडी पोलीस निरीक्षक श्री. बेलखेडे आणि तिन्ही पोलीस ठाण्यातील चमु तीव्र गतीने तपास चक्रे फिरवित आहेत.

0 Response to "जिल्ह्यात "पोक्सो" घटनांची मालीका सुरूच"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article