शासकीय जागेत लाकूड ठेवणाऱ्यांना नेमके अभय कुणाचे ?
- तालुक्यातील अनेक गावात काटाइ केलेल्या लाकडाचे ढीग शासकीय जागेतच.
नरेन्द्र मेश्राम
पालादुंर परिसर हे वनसंपदेने बहरलेले आहे.परिसरात अनेक बहुउपयोगी झाडांच्या प्रजाती बघायला मिळतात. मात्र परिसरात होणारी वृक्ष तोड हीही तेवढीच चिंतेची बाब आहे.त्यातच तोडलेले वृक्ष आता बिनधास्त पणे शासकीय जागेत महिनोनमहिने ठेवले जात आहेत.त्यामुळे या लाकूड व्यापाऱ्यांना वन विभाग किंवा महसूल विभाग या पैकी नेमका अभय कुणाचा? हा प्रश्न निर्माण होत आहे.
परिसरात अनेक प्रकारचे वृक्ष आढळतात आणि वृक्ष संपदा ही मोठ्या प्रमाणात लाभली आहे. मात्र वृक्ष कत्तल करणारे व्यापारीही मोठ्या प्रमाणात वाढले असून ही संपदा धोक्यात आली आहे. त्यातच लाखनी तालुक्यातील अनेक गावात शासकीय जागेत बिनधास्त पद्धतीने हे लाकूड जमा करून ठेवण्याचे प्रकार सुरू आहेत.मात्र या संबंधी वन विभाग अथवा महसूल विभाग हे सर्व प्रकार दिसून डोळे बंद करण्याचे नाटक करत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात जेवनाला येथील पाटाची दान या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून सागवान,चिंच, नीम इत्यादी अनेक प्रजातीच्या झाडांचे लाकडे मोठ्या प्रमाणात जमा करून ठेवले आहेत.ही बाब गावकऱ्यांनी वन विभाग व महसूल विभाग यांच्या लक्षात आणून दिली होती मात्र संबंधित व्यापारी या वर काही कार्यवाही केली नाही अथवा ती जागा रिकामी ही न झाल्याचे दिसून येत नाही. या ठिकाणी तरुण मुलांचे व्यायाम करण्याचे मैदान आहे. त्यामुळे गावातील तरुणांना अडचण निर्माण होत आहे. मात्र शासकीय यंत्रणा ह्या डोळे बंद करून असल्याने या व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार लाखनी तालुक्यात सुरू आहे.त्यामुळे आता या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणातून शासकीय जागा रिकामी कोण करणार हा प्रश्न निर्माण होत आहे.
0 Response to " शासकीय जागेत लाकूड ठेवणाऱ्यांना नेमके अभय कुणाचे ?"
एक टिप्पणी भेजें