महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील ग्राम महालगाव ठरले संपूर्ण भारतातील पहिले स्मार्ट मीटर विरोधी ठराव मंजूर करणारे गाव.
गुरुवार, 24 जुलाई 2025
Comment
• अभय डी रंगारी राष्ट्रीय किसान मोर्चा , नई दिल्ली यांच्या प्रबोधनाचा जागृती परिणाम
• वितरण कंपनी ( महावितरण) चे "चोरी -चोरी , चुपके -चुपके" मीटर बदलविण्याच्या कामाचा भांडाफोड.
हर्षवर्धन देशभ्रतार
भंडारा :- "कही पे निगाहे - कही पे निशाणा "" यानुसार वीज वितरण कंपनी सर्व देशवासियांचे लक्ष भारत पाकिस्तान युद्धाच्या बातम्या कडे लागले असतांना आणि ग्रामीण भागातील लोकांना रोजगार हमी योजना राबविण्यात व्यस्थ असतांना पाहून ""सुमंडी मध्ये कोंबडी खाणे ""या म्हणी नुसार ग्राहक राज्याला कोणत्याही प्रकारची माहिती किंवा पूर्वसूचना न देता अंधारात ठेवून जुने चालू अवस्थेत असलेले मीटर वीज वितरण कंपनी मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड रिचार्ज वाले मीटर लावून ग्राहकांच्या भोळेपणाचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेतांना दिसत आहे ,
जनतेचे सेवक असणारे , शासन प्रशासनात बसणारे सुजाण लोकांना सुद्धा स्मार्ट प्रीपेड रिचार्ज वाला मीटर ला शक्तीने बसविण्याच्या योजनेला , भारत मुक्ती मोर्चा , महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना , बहुजन मुक्ती पार्टी अशा देशातील अनेक संस्था नी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करून ही योजना स्थगित करण्यास भाग पाडले , आजघडीला ही मीटर प्रणाली शासन दरबारी आणि वीज वितरण कंपनी च्या इमारती मध्ये सुरू असताना , देशातील अनेक राज्यातील महाराष्ट्र राज्यासकट जिल्ह्यातील अनेक गावात कोणत्याही प्रकारची लेखी , मौखिक अशी पूर्वसूचना न देता चोर पावलांनी मीटर लावण्याचे काम जोमाने सुरू आहे ,
वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 47 (5) नुसार मीटर वापरा संबंधि स्वातंत्र्य आणि निवड करण्याच्या कायदेशीर ग्राहक हक्काला बगल देऊन मीटर लावण्याचा गैरप्रकार खुले आम सुरू आहे , याकडे शासन प्रशासन आणि निवडणूक च्या हंगामात मी नेता , मी नेता ,म्हणून मोठं मोठे बॅनर लावणारे लोकप्रतिनिधी कोणीही लक्ष देत नाही , असा आरोप जनता करीत आहे ,
मीटर लावण्याकरिता जे कंत्राटी कामगार येतात त्यांच्या म्हणण्यानुसार सदर मीटर स्मार्ट आहे परंतु प्रीपेड किंवा रिचार्ज वाला नाही आहे , मात्र तसे लेखी लिहून मागितले असता कंत्राटी कामगार आणि संबंधित विभागाचे अधिकारी लिहून देण्यासाठी तयार नाही , मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन वरिष्ठ अधिकाऱ्याकडे बोट दाखवून मोकडे होताना दिसतात , यामुळे जनता संभ्रमित अवस्थेत असून निराशाजनक भीतीच्या वातावरणात आर्थिक संकटात सापडलेली आहे ,
ग्राहकांच्या हक्काचे संरक्षक करणे वीज वितरण कंपनी चे मूलभूत कर्तव्य असताना , ""कुंपणच जर शेत खात असेल तर ,या न्यायाने ग्राहक लोकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी , असा डोंगराएवढा प्रश्न जनतेला पडला आहे , मीटर बदलून देणाऱ्या कंत्राटी कामगाराकडे कोणत्याही प्रकारचा अधिकृत ओळखपत्र सुद्धा दिसत नाही , असे जनतेचे म्हणणे आहे ,
सर्व देशातील लोकांचे भारत पाकिस्तान च्या बातम्याकडे लक्ष असतांना आणि ग्रामीण भागातील लोक रोजगार हमी योजनेवर कामाला जाताना पाहून वीज वितरण कंपनी ने काम सुरू केले आहे ,असा गंभीर आरोप जनता करीत आहे , खाजगी कंपनी ला फायदा मिळावा यासाठी सदर योजना राबविण्यात येत आहे हे आता जनतेच्या लक्षात येत आहे , तसा तसा या मीटर ला विरोध वाढत आहे ,
जनतेच्या भावना आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सदर मीटर लावू नये , अन्यथा जनता रोडवर येऊन राष्ट्रव्यापी जनआंदोलन करेल असा इशारा संतप्त जनतेने दिला आहे ,
अनेक लोकांना जुना मीटर होता तेव्हा 500 च्या आसपास बिल येत होते , मात्र स्मार्ट मीटर ( रिचार्ज वाला मीटर ) लावल्यानंतर पाच हजार ,ते 25 हजार बिल आलेले आहेत , असे संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात निदर्शनास आले आहे ,म्हणून स्मार्ट मीटर विरोधात असा ठराव घेण्यात आला ,
वीज वितरण कंपनी चे संबंधित अधिकारी हे आज घडीला वाढीव बिल कमी करून देऊ असे म्हणतात , परंतु भविष्यात वाढीव बिल कमी करून द्याल काय , असे जनतेला लेखी लिहून द्यायला अधिकारी तयार नाहीत , यावरून हे एक मोठे षड्यंत्र आहे , असे वाटते ,
ते काहीही असो , हे मात्र नक्की की महालगाव ग्रामपंचायत ने हा जो जनहितार्थ आणि देशहितार्थ लक्षात घेऊन स्मार्ट मीटर ,रिचार्ज वाला मीटर विरोधात ठराव घेऊन जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक धाडस आणि आदर्श निर्माण केला.
0 Response to "महाराष्ट्र राज्यात भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील ग्राम महालगाव ठरले संपूर्ण भारतातील पहिले स्मार्ट मीटर विरोधी ठराव मंजूर करणारे गाव."
एक टिप्पणी भेजें