मंत्रालयात आता ऑफलाइन प्रवेश बंद
रविवार, 27 जुलाई 2025
Comment
"साप्ता जनता की आवाज"
मुंबईः राज्य सरकारकडून मंत्रालयात प्रवेशासाठी जुन्या पद्धतीने दिला जाणारा ऑफलाइन प्रवेश यापुढे बंद करण्यात येणार आहे. येत्या एक ऑगस्टपासून मंत्रालयातील प्रवेशासाठी डिजिप्रवेश ही ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य केली जाणार आहे. या संदर्भातील सूचना मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून, त्याशिवाय सर्व मंत्री कार्यालयांतही याबाबतची सूचना देण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील प्रवेशासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 'फेस रेकग्नायझेशन' प्रणालीला सुरुवात केली होती. या प्रणालीची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर मंत्रालयात यापुढे अभ्यागतांना प्रवेशासाठी नवी प्रणाली सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
0 Response to "मंत्रालयात आता ऑफलाइन प्रवेश बंद"
एक टिप्पणी भेजें