-->

Happy Diwali

Happy Diwali
नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी आरोपीला अटक

नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी आरोपीला अटक


नागपूर :- नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी भाजपचे भंडारा येथील माजी खासदार सुनील मेंढे यांचे भाऊ व माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे ह्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

      सतीश मेंढे हा आरोपी फरार असताना भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे लपून बसला असल्याची माहिती तपास यंत्रणांना प्राप्त झाली होती हे विशेष.

      `सतीश मेंढे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले जाते. ह्याने बोगस शिक्षक भरती करून करोडोची संपत्ती देश विदेशात खरेदी केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सतीश मेंढे ह्या आरोपीने शिक्षक भरती करताना अनेक गोरगरीब व होतकरू शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या बेरोजगारांचे प्रचंड मोठे नुकसान केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.`
      या घोटाळ्यात आतापर्यंत चार अधिकारी, मुख्याध्यापक, शाळा संचालक व कर्मचारी अशा एकूण १८ जणांना अटक केली आहे. मेंढे याची अनेक दिवसांपासून अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धडपड सुरू होती. मात्र त्याला यात यश आले नाही.

       शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार संदीप जोशी यांनीच सर्व प्रथम उघडकीस आणला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली होती.

        पावसाळी अधिवेशनातही प्रवीण दटके यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी चौकशी स्थापन केली आहे.

        दिवंगत शिक्षणाधिकारी यांच्या सोमेश्वर नेताम यांच्या बनावट स्वाक्षरीने नागपूर विभागात शेकडो शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कोव्हीडनंतर सर्वांना नियमित करण्यात आले. त्यांचे शालार्थ आयडी तयार करून एरिअस काढण्यात आला. तो शिक्षण विभागातील अधिकारी आणि शाला संचालकांनी वाटून घेतला.
         बनावट शालार्थ आयडीद्वारे नागपूर विभागात तब्बल २७०० शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे आमदार दटके यांनी विधानसभेत सांगितले होते. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी तीन वेळा समिती स्थापन करण्यात आली होती.

      या समितीच्या तीनही अध्यक्षांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांना अटकही करण्यात आली आहे. यावर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा ही वस्तुस्थिती असल्याचे सांगतले. दटके यांच्या सुचनेनुसार त्यांनी आएसएस आणि आयपीएस सोबतच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची समांतर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा ही वस्तुस्थिती असल्याचे सांगतले. दटके यांच्या सुचनेनुसार त्यांनी आएसएस आणि आयपीएस सोबतच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची समांतर चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.

       १९ लोकांवर आतापर्यंत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काहींना अटकसुद्धा करण्यात आली आहे. काहींची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल विधानसभा मतदरसंघातील दलालांच्या नावांची यादी नागपूरच्या पोलिस आयुक्तांना यापूर्वीच सोपविली आहे. दादा भुसे यांच्याही मतदारसंघात बोगस भरती झाल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता.

0 Response to "नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी आरोपीला अटक "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article