-->
 गंमत जम्मत अगांवर बेतला, कोब्रा साँपने युवकाचा जीव घेतला.

गंमत जम्मत अगांवर बेतला, कोब्रा साँपने युवकाचा जीव घेतला.

  • शासनाने उपजिल्हा रुग्णालयातून तुमसर येथे अँटी वेनम वेक्सिन उपलब्ध करून देण्याची गरज.
  • शासकीय ॲम्बुलन्स २४ घंटे उपलब्ध राहील अशी लोकप्रतिनिधीने दखल घेण्याची गरज.

"जनता की आवाज" 

तिरोडा :- तिरोडा तालुक्यातील ग्राम। पाटील टोला येथे आज लकी लंकेस बागडे या युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला, सविस्तर वृत्त असे की,पाटील टोला येथे कोब्रा साप असल्याची माहिती मिळाली तेव्हा लंकेश बागडे हा धावून गेला व त्याला कोणतेही अनुभव व सर्पमित्र नसताना केवळ गंमत जंमत असे समजून कोब्रा सापाच्या मुंडीला पकडले परंतु कोब्रा चा फण ने त्याचा चावा घेतला घटनेनंतर त्याला तातडीने सुभाष चंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल करण्यात आले परंतु सर्पदंश असल्याची अँटी वेनम वॅक्सिंग व शासकीय ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे युवक ची गंभीर स्थिती होऊन वैद्यकीय सल्ल्यानुसार तातडीने खाजगी ॲम्बुलन्सने भंडारा येथे हलवण्यात आले जर वेळेवर अँटी व्हॅक्सिन व शासकीय ॲम्बुलन्स उपलब्ध असती तर कदाचित युवकाच्या मृत्यू झाला नसता असा विषय चर्चेत आहे। पावसाळ्याला सुरुवात झाली असून गच्चार पाच दिवसापासून धो धो पाऊस पडत आहे अशात ग्रामीण स्तरावर सरपटणारे प्राणी आपल्या आहारासाठी निघत असतात अशाच प्रकारे शहरे किंवा ग्रामीण विभागात केव्हाही दुर्दैवी घटना होण्याची शक्यता टाळता येत नाही करिता शासनाने व लोकप्रतिनिधीने दखल घेऊन अँटिव्हायरस, वॅक्सिंग व वेळेनुसार ॲम्बुलन्स रुग्णांना उपलब्ध होईल अशी दखल घेण्याची गरज आहे.



0 Response to " गंमत जम्मत अगांवर बेतला, कोब्रा साँपने युवकाचा जीव घेतला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article