-->

Happy Diwali

Happy Diwali
मुख्यमंत्री देवेंद्र . फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत

मुख्यमंत्री देवेंद्र . फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत


• जिल्हा न्यायालय नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ. 
जि.प्रति. ''साप्ता.जनता की आवाज" 
 भंडारा :- जिल्हा न्यायालय नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवार, दिनांक येत्या २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, अनिल .स. किलोर वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर यांचे शुभहस्ते, महेंद्र वा. चांदवाणी, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर तथा पालक न्यायमूर्ती भंडारा जिल्हा यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, भंडारा राजेश गो. अस्मर, यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 
     🔹जिल्हा न्यायालय, भंडाराच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात सकाळी १०.३० वाजता संपन्न होत असून, पुढील कार्यक्रम हेमंत सेलेब्रेशन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३, भंडारा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रम समारंभात जिल्हा न्यायालय, भंडारा तसेच अधिनस्त न्यायालयातील सर्व न्यायीक अधिकारी, बार कौन्सिल सदस्य, अधिवक्तागण, कर्मचारी वृंद तसेच जिल्हयातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 
सन १९२२-२३ पासून दगडी इमारतीमध्ये जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर सन १९८५ साली जिल्हा न्यायालय नूतन इमारतीमध्ये स्थानांतरीत झाले. आता या दोन्ही इमारती कायम ठेवून नूतन इमारतीचे बांधकाम करावयाचे नियोजित आहे. या सर्व सोयीयुक्त तयार होणा-या नूतन इमारतीमुळे सर्व पक्षकार, वकील मंडळी व कर्मचारी यांना फायदा होणार आहे. असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गो. अस्मर यांनी कळवले आहे.

1 Response to "मुख्यमंत्री देवेंद्र . फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत"

  1. पौनी तालुका मधिल तलाठी कार्यालय चे थकित किराया सन 2013 पासुन थकीत आहे कलेक्टर व तहसीलदार चार वर्ष पासुन निवेदन देवून काहीच उपयोग झाला नाही

    जवाब देंहटाएं

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article