
"अखिल नारी शक्ती विकास संस्था घाटकोपर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप..!
सोनू संजीव क्षेत्रे
आज प्रती वर्षा प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा "अखिल नारी शक्ती विकास संस्था घाटकोपर" च्या माध्यमातून घाटकोपर येथील सहयोग एनजीओ संचालित मतिमंद मुलांचे शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन्सिल, आणि खाऊचे वाटप करण्यात आले त्या वेळेस शाळेचे शिक्षक गणेश सर व शिक्षका शिवानी मँडम यांचे अनमोल असे सहकार्य लाभले .त्या वेळी संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा व अनेक संस्था ,संघटनांचे पदे भूषविणारे समाजसेविका सौ. संगीता सूर्यकांत मांडे,सौ प्रतिक्षा किरण शिंदे ,दीपाली तांबे, मनिषा लांडे,आशा कोरडे , समाजसेविका पद्मा मँडम व इतर महिला सभासद उपस्थित होत्या.
"अखिल नारी शक्ती विकास संस्था घाटकोपर " च्या अध्यक्षाचे गरीब गरजू मुलांचे चेहऱ्यावरील हसू हेच माझ्या " अखिल नारीशक्ती विकास संस्था घाटकोपरचे " मुख्य उद्देश आहे.
असे अनेक उपक्रम महिलांवर होणारे अन्याय्य विरुद्ध आवाज उठवणे, महिलांचे उन्नती विकासासाठी, रोजगार उपलब्ध करून देणे तसेच समाजातील तळागाळातील गरजू महिलांचे विकासासाठी अखिल नारी शक्ती विकास संस्था घाटकोपर सदैव तत्पर एक पाऊल पुढे असते.
घाटकोपर मधील महिलांचा कुठलेही समस्ये चे निवारण करून योग्य मार्गदर्शन , तसेच खात्रीशीर न्याय मिळवून देण्याचे कार्य सदर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे.
0 Response to " "अखिल नारी शक्ती विकास संस्था घाटकोपर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप..! "
एक टिप्पणी भेजें