
महाराष्ट्र शासनाच्या एक पेड माँ के नाम शालेय उपक्रम जोपासत पर्यावरण संरक्षणार्थ वृक्षारोपण
नरेंद्र मेश्राम
भंडारा : महाराष्ट्र शाषणाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यात एक पेड माँ के नाम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी आई सोबत एक झाड लावून फोटो दिलेल्या लिंक वर पाठवून प्रमाणपत्र मिळविण्याचा उपक्रम जोरात सुरु आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या इको क्लब, स्काऊट गाईड च्या विद्यार्थ्यांसह केंद्रीय मानवधिकार संघटन व विविध सामाजिक संघटनाकडून वाढदिवसाला इतर खर्च करुन निर्जीव फ़ांद्या व फुले यांचे बुके वापरण्या पेक्षा जिवंत मोठं वृक्ष लावून वृक्षारोपण करण्याचा संदेश देणारा कार्यक्रम साजरा करण्यात आला. मोठ्या प्रमाणात होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास त्यामुळे भेडसावत असलेल्या विविध समस्या त्याच संकल्पनेतून
पर्यावरणाचा संरक्षण हि काळाची गरज आहे. वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मिळु शकेल. आक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल. वृक्षारोपण वृक्षसंवर्धन जबाबदारीच जोपासणे काळाची गरज आहे म्हणून वृक्ष लावुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया.या संकल्पनेतून संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालय व माऊली आय.टी.आय. गिरोला कारधा येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला संत शिवराम महाराज माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना भोयर, उच्च प्राथमिक विभाग मुख्याध्यापक देवचंद चौधरी, धीरज बांते, संजय पडोळे, अलका हटवार,दारासिंग चौव्हाण,सैनपाल वासनिक, राधिका बांते, पार्बता बिसने,रंजना भिवगडे,माया वैद्ये, कुसुम सार्वे, शिल्पा मरकाम,रंजना चाचेरकर, प्राची मेश्राम, सौं पंचबुद्धे,गंगाधर भदाडे, राजू निंबार्ते, जागेश बांते,माऊली आय टी आय चे संचालक प्रकाश पंचबुद्धे, सचिन कारेमोरे, प्रवीण डोरले, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, नवप्रवाह चे जिल्हा प्रतिनिधी प्रवीण भोंदे, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे,यांनी दरवर्षी नुसार यंदाही शेखर बोरकर यांचा वाढदिवस विविध ठिकाणी वृक्ष रोपण करून साजरा करण्यात आला. या वेळी मोठया संख्याने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
0 Response to " महाराष्ट्र शासनाच्या एक पेड माँ के नाम शालेय उपक्रम जोपासत पर्यावरण संरक्षणार्थ वृक्षारोपण"
एक टिप्पणी भेजें