पावसाने दाखवली पाठ... कोरडवाहू रोवणी थांबली!
- मोठा पाऊस आला तसा गेला
- नक्षत्र बदलला मात्र पावसाचे चिन्ह नाही
![]() |
| फोटो : कोरडवाहू शेतीतील पऱ्याची वाढीव अवस्था , पाण्याविना पिवळे होत असलेली पऱ्हे |
नरेंद्र मेश्राम
पालांदूर :- गत हप्ताभरापासून पावसाने पाठ दाखवली आहे. पऱ्हे रोवनी योग्य असले तरी पाऊस नसल्याने कोरडवाहूची रोवनी थांबली आहे. तापमान वाढत आहे. त्यामुळे पऱ्हे पिवळे पडत असून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. आज पुष्प नक्षत्र लागला असून त्याला वाहन मोर पक्षी आहे. यात रिमझिम पाऊस बर असेल की शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला मोठा पाऊस होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
८ जुलै पासून दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नदी नाले तलाव भरले. पूर परिस्थिती निर्माण झाली. मात्र शेतात पाणी थांबला नाही. अतोनात पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा पाणी बांधानात बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे अगदी चार दिवसात बांदान कोरडे झाले.
निसर्ग झाला लहरी...
निसर्ग लहरी झाला आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खरा ठरल याची शाश्वती उरली नाही. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज डोळ्यापुढे ठेवून शेतीचे नियोजन करणे कठीण होत आहे. जुलै महिना निश्चितच सर्वांच्या दृष्टीने खूप पावसाचा असला तरी अजून पर्यंत अपेक्षित असा नियमित पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
पावसाच्या ओढीने मजुरीत वाढ...
अपेक्षित नियमित पाऊस पडत नसल्याने मिळेल त्या परिस्थितीत मजुरांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न शेतकरी बांधव करीत आहे. अशा या कठीण परिस्थितीमुळे मजुरांच्या मजुरीत दुपटीने वाढ होताना दिसत आहे. महिला मजुरांची दोनशे रुपये पर्यंत असलेले दैनंदिन मजुरी थेट तीनशे रुपये पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात नाहक वाढ सहन करावी लागत आहे.
पुष्प नक्षत्र पाऊस देणार काय?
जुन्या म्हणीनुसार पुष्प नक्षत्र थोडा शांत शितल वाऱ्यासह पाऊस पुरवतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोर पक्षाला आनंद मिळेल असा रिमझिम पाऊस पुष्प नक्षत्रात असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वांना सहन करीत निसर्गासोबत चालण्याचा जणू संदेश निसर्ग पूर्वत असल्याचे चित्र दिसत आहे.
आठ तासाची वीज अपुरी...
कृषी फिडरला मिळणारी आठ तासाची वीज अपुरी पडत आहे. आठ तासाच्या सिंचनात रोवणी करणे कठीण होत आहे. त्यामुळे रोवणीचा कालावधी वाढत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे पाण्याची गरज वाढत चाललेली आहे.
शेतकऱ्यांनी रोवणी करिता घाई करू नये. जुलै महिना पूर्णतः रोवणी करिता अनुकूल आहे. पाऊस येणारच! या आशेने शेतीचे नियोजन करा. २२ जुलै नंतर सर्वदूर मोठा पाऊस होण्याचा आशावाद हवामान खात्याने पुरविला आहे.
गोपीचंद भेंडारकर शेतकरी तई (बु)
0 Response to "पावसाने दाखवली पाठ... कोरडवाहू रोवणी थांबली! "
एक टिप्पणी भेजें