पालांदूर मंडळात ५० टक्के रोवणे पूर्णत्वाकडे, १०,४११ हेक्टरवर धान.
सोमवार, 21 जुलाई 2025
Comment
• आवत्या ४५२ हे,५०.५२ टक्के सरासरी.
पालांदुर:- खरीप हंगाम करिता पालांदूर मंडळकृषी अंतर्गत भात पिकाचे सर्वसाधारण क्षेत्रफळ १०४११.१० हेक्टर एवढे आहे. पावसाने ओढ दिल्याने किमान २५ दिवसात अर्धी रोवनी आटोपलेली आहे. ४८०८ रोवनी तर ४५२ हेक्टर आवत्याची लागवड पार पडली. कोरडवाहूचा शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. एकंदरीत ५२६० हेक्टरवर धानाची लागवड झाली आहे.
धानाची शेती दिवसेंदिवस अधिक खर्चाची होत आहे. धानपट्ट्यात पावसाची नियमितता नसल्याने अनेक अडचणीचा सामना धान उत्पादकांना करावा लागत आहे. मात्र यातही शक्य ते मार्गदर्शन पालांदूर मंडळ कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. नरेंद्र झलके कनेरी यांच्या शेतावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत गादीवाफ्यावर भात रोपाची नर्सरी तयार करून १४ दिवसाच्या भात रोपांची लागवड दोरीच्या आधाराने सरळ पद्धतीत करण्यात आली. यातून अधिक उत्पादनाकरिता सहकार्य मिळते.
नर्सरी तयार करताना शेतकऱ्यांना अपडेट ठेवीत २१ दिवसापर्यंतचे पऱ्हे लागवडीखाली आणण्याकरिता सिंचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलेले मार्गदर्शन स्तुत्य ठरले. कोलारा/ पळसगाव, पहाडी, पालांदूर, कनेरी अशा ५२ गावातील शेतकऱ्यांना धान लागवडीचे थेट मार्गदर्शन कृषी विभागांतर्गत सुरू आहे.
धान उत्पादक होतोय हायटेक...
पालांदूर मंडळ कृषी कार्यालय अंतर्गत बरीच गावे चुलबंद नदी खोऱ्यात येतात. या भागात सिंचन सुविधा असणारे शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. केवळ धान हे एकच उत्पादन नाहीतर भाजीपाला सुद्धा अधिक प्रमाणात पावसाळ्यातही सुरू आहे. नवे तंत्रज्ञ स्वीकारण्याची तयारी भात उत्पादक शेतकऱ्यांची आहे. अधिक उत्पन्नाकरिता भात उत्पादक शेतकरी अपडेट होत आहे.
शेतकरी बांधवांनो, शक्यतो कमी खर्चात व्यवस्थित नियोजन करून धान उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी असल्यास कृषीअधिकारी यांच्याशी संपर्क साधून नवनवे प्रयोग करण्याकरिता पुढाकार स्वीकारा. कोरडवाहू शेतकऱ्यांनी रोवणीकरिता घाई करू नये. पावसाचा अंदाज घेऊन रोवणीचे नियोजन साधा. खताची मात्रा विभागून द्या. नत्राची मात्रा एकाच वेळेस देऊ नका. खते खरेदी करताना अधिकृत कृषीनिवेष्ठाधारकाकडूनच खरेदी करावी. खरेदीची पावती सुद्धा जपून ठेवावी. खते मिळत नसल्यास आमच्याशी संपर्क साधा.मंडळ कृषी अधिकारी विकास झलके पालांदूर.
0 Response to "पालांदूर मंडळात ५० टक्के रोवणे पूर्णत्वाकडे, १०,४११ हेक्टरवर धान."
एक टिप्पणी भेजें