-->

Happy Diwali

Happy Diwali
 "त्या" डॉक्टराचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा न्यायालयाने फेटाळला

"त्या" डॉक्टराचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा न्यायालयाने फेटाळला

  • प्रकरण साकोली येथील अल्पवयीन दलित मुलीसोबत अश्लील कृत्याचे ; 
  • आरोपी डॉक्टर १० दिवसांपासून अद्याप फरारच 


संजीव भांबोरे

भंडारा -: शहरातील नामांकित श्याम हॉस्पिटल येथील डॉ. देवेश अग्रवाल यांनी ९ जुलैला एका  अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अर्धा तास अश्लील कृत्य केले होते. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीसांनी लैंगिक छळाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवसांपासून आरोपी डॉक्टर फरार आहे. बुधवार १६ जुलैला आरोपी डॉ. देवेश अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा येथील जिल्हा व सत्र न्यायालय फेटाळला आहे.

         आरोपी डॉक्टरने एका १७ वर्षीय दलित अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात केलेल्या अश्लील कृत्याचे साकोलीसह जिल्हयात संतप्त पडसाद उमटले होते. नराधम डॉक्टरला अटक करा, या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत. ९ जुलैला शहरातील नामांकित असलेल्या श्याम हॉस्पिटलचे डॉ. देवेश अग्रवाल यांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अर्धा तास गैरकृत्य केले. पिडीत मुलीच्या आईने साकोली पोलीस ठाणे गाठले व डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आरोपी डॉ. देवेश अग्रवाल यांचे विरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४ (२), (१), ६५ (१) तसेच  बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तेव्हापासून आरोपी डॉक्टर फरार आहे. साकोली पोलीस त्याच्या शोधासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेशापर्यंत पोहचली आहे. मात्र अद्याप आरोपी पोलिसांना गवसला नाही. या घटनेनंतर साकोली शहरासह जिल्हयात आरोपीच्या अटकेची मागणी जोर धरत आहे.

             बुधवार १६ जुलैला आरोपी डॉक्टर देवेश नरसिंगदास अग्रवाल यांच्या वकीलामार्फत भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. तो जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. फरार आरोपी डॉक्टर हा विदेशात जाऊन लपला तर नसावा अशा चर्चा नागरिकांत सुरू आहेत.

0 Response to " "त्या" डॉक्टराचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा न्यायालयाने फेटाळला"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article