नागरिकांचे हाल, गढूळ पाण्याच्या बाटल्या भेट देत वेधले लक्ष
शुक्रवार, 25 जुलाई 2025
Comment
भंडारा न.पा मुख्याधिकाऱ्यांना गढूळ पाणी दिले भेट.
• नागरिकांचे हाल गंडूळ ळ पाण्याच्या बाटल्या भेट देत वेदले लक्ष
"साप्ता जनता की आवाज"
नरेन्द्र मेश्राम
भंडारा :- नगरपालिकेमध्ये प्रशासक राज असल्यामुळे शहरातील अनेक प्रभागांतील समस्या रेंगाळत आहेत. रस्ते, नाल्या, स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यासह अनेक प्रश्नांवर आक्रमक होत गुरुवारी राष्ट्रवादी शरद पवार पदाधिकाऱ्यांनी गटाच्या नगर पालिकेत धडक दिली, मुख्याधिकाऱ्यांना समस्यांचा जाब विचारला. एवढेच नाही तर, गढूळ पाण्याच्या बाटल्याही त्यांना भेट दिल्या.
माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे व शहराध्यक्ष मधुकर चौधरी, जिल्हा सचिव अजय मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन झाले.
मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यांना घेराव करून निवेदन दिले आणि समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. शहरात गढूळ पाणीपुरवठा होत असतानाही कर्मचाऱ्यांना पाठीशी का घालता, असा प्रश्न उपस्थित केला. प्रत्येक भागात तक्रार निवारण शिबिरे घेऊन समस्यांचे निवारण करा. आठ दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात शहराध्यक्ष मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे, चेतराम काकुसे, शुक्राचार्य डोंगरे, यशवंत भोयर, मधुकर भोपे, राजू थोटे, इंद्रजित येणे, जावेद शेख, युवती जिल्हाध्यक्ष नीलिमा रामटेके, शहराध्यक्ष शाहिना खान, लता बावनकुळे, नीलिमा मेश्राम, योगिता सूर्यवंशी यांच्यासह अनेकांचा सहभाग होता.
*या होत्या मागण्या*
मोठा बाजार ते हॉस्पिटल या मार्गाच्या बांधकामातील कंत्राटदाराच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, शहरातील बौद्ध विहारात तयार केलेल्या ई-लायब्ररीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, संबंधित
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे व कार्यवाही करावी. शहरामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. कुकडे नर्सिंग ते पांडे महाल मार्ग त्वरित रिपेअर करावा. गांधी चौक ते नगरपरिषदेच्या पाठीमागून पूर्व दिशेला आंबेडकर वॉर्डातून जाणाऱ्या नाल्याची शेवटपर्यंत साफसफाई करावी. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच बंद पडलेले ट्रॅफिक सिग्नल त्वरित सुरू करावे. टाकळी परिसरात तुमसर रोडवर नवीन स्मशानभूमी निर्माण करावी, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.
0 Response to "नागरिकांचे हाल, गढूळ पाण्याच्या बाटल्या भेट देत वेधले लक्ष"
एक टिप्पणी भेजें