-->
 महाराष्ट्र-मध्य प्रदेश आंतरराज्य संपर्क तुटला.

महाराष्ट्र-मध्य प्रदेश आंतरराज्य संपर्क तुटला.

  • बावनथळे नदीच्या पुलावरून पाणी वाढल्याने कटंगी तुमचं भंडारा वाहतूक बंद.
  • भंडारा जिल्ह्यात आरेंज अलर्ट व सर्वत्र शाळेला दोन दिवसाची सुट्टी घोषित.

 भडांरा "साप्ता.जनता की आवाज" :- जिल्ह्यात चार दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे.दोन दिवसापासून पावसाची सतत धार असून जीवन विस्कळीत झाले आहे.तुमसर मोळी तालुक्यात वाहतूक बंद झाली तर भंडारा सरल गच्चकार दवानगंगा नदीवरील वाहतूक बंद करण्यात यात आली आहे जिल्ह्यात नदी व धरण क्षेत्रात पाऊस कोसळत असल्याने वैनगंगा नदीचे पात्र वाढल्यामुळे जलमय साठा वाढ झाल्यामुळे गोसे कुछ धरणाचे 33 दरवाजे उघडे केले आहेत तसेच तुमचा तालुक्यात सतत दमदार पाऊस सुरू असल्यामुळे शेतसीवार जलमग्न झाले असून त्याच्या फटका तामसवाडी-उरवाडा-येरली,गोंदेखारी-नकळसूकडी,कर्कापूर-पाजंरा,सिलेगांव-वाहनी तसेच मोहाळी तालुक्यातील करडी-मुढंरी- केसलवाडा-रोहा-बटाळा-उसर्रा-टाला,डोंगरगाव -काहळगांव(सी.) ,ताडगांव-सिहरी या गावची वाहतूक ठप्प झाली असून बावनथळी नदीवर पाण्याची पातळी वाढल्याने कटंगी- तुमसर-भंडारा वाहतूक बंद करण्यात आली आहे.त्यामुळे महाराष्ट्र-मध्य प्रदेश आंतरराज्य संपर्क तुटला आहे. जिल्हयात सतत पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून,याचा फटका शेतकरी, किरकोळ-व्यवसायिक व सामान्य नागरिक वर बसलाअसून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा फटका बसू शकतो असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने दर्शीला आहे करिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन याने सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.

0 Response to " महाराष्ट्र-मध्य प्रदेश आंतरराज्य संपर्क तुटला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article