-->

Happy Diwali

Happy Diwali
साकोलीत डॉक्टर नंतर आता खाजगी शिक्षकाचा हैवानी प्रकार

साकोलीत डॉक्टर नंतर आता खाजगी शिक्षकाचा हैवानी प्रकार

• शिक्षकाचे विद्यार्थीनीशी अश्लील चाळे 
• पोलीस ठाणे डुग्गीपार येथे "पोक्सो" अंतर्गत गुन्हा दाखल ; शिक्षकाला न्यायालयाची पोलीस कोठडी 
संजीव भांबोरे
गोंदिया -शिक्षक सारखा पवित्र पेशाला काळीमा फासणारी घटना सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आली आहे . सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळा कोहळीटोला असून ती (आदर्श शिक्षण संस्था सावरी (ज.न.) ता. जिल्हा भंडारा (अल्पसंख्यांक) द्वारे संचालित असलेल्या या खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. त्यापूर्वी साकोली शहरातील डॉक्टरने एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केले होते. आणि आता या शिक्षकाने समाजाला कलंकित करण्याचा संतापजनक प्रकार केला आहे. 
          पोलिस विभागाने दिलेल्या माहिती नुसार संबंधित शिक्षकावर विविध प्रकारच्या कायद्या द्वारे गुन्हा नोंद करण्यात आला. शामराव रामाजी देशमुख (५३, रा. कोहमारा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो सन २०२३ पासून २०२५ या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील वर्तन करीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाइन क्रमांक १०९८ या हेल्पलाइनवर करण्यात आली. तक्रारीनंतर बाल न्यायालय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यात संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचे स्पष्ट झाले. डुग्गीपार पोलीसांनी त्या नराधम शिक्षकावर भारतीय न्याय संहिता ६४ (२), ६५ (२), ७५ (२), १८१ (१), बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) ४,६,१२, आणि ७५ जेजे ऍक्ट, अंतर्गत डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व त्याला अटक करून पोलिस कोठडीनंतर २१ जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
          या शिक्षक आरोपीला सोमवार ता. २१ जुलैला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सोमवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एका विद्यार्थीनी मुलींसोबत काळीमा फासणारी घटनेबाबद परीसरात त्या शिक्षकाविरोधात भयंकर संताप व्यक्त केला जात आहे. 

• प्रतिक्रिया - 

"संबंधित शिक्षकावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून या गंभीर घटनेचा आणखी सखोलपणे तपास सुरू आहे"

गणेश वणारे - 
पोलीस निरीक्षक 
डूग्गीपार पोलीस ठाणे

0 Response to "साकोलीत डॉक्टर नंतर आता खाजगी शिक्षकाचा हैवानी प्रकार"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article