-->

Happy Diwali

Happy Diwali
CATC 611 शिबिरात समर्थ विद्यालयाच्या कॅडेट्सची फायरिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

CATC 611 शिबिरात समर्थ विद्यालयाच्या कॅडेट्सची फायरिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी



•दिशांत राऊत, तन्मय हुंमने आणि सचिन बावणे बेस्ट फायरर म्हणून गौरवल

नरेन्द्र मेश्राम 
"साप्ता जनता की आवाज" 
लाखनी :– फोर महाराष्ट्र बटालियन एनसीसी नागपूर यांच्या मार्फत सावनेर येथे आयोजित Combined Annual Training Camp (CATC-611) या सैनिक शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 450 एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. शिबिरातील फायरिंग रेंजवर झालेल्या Laying Position Target Firing स्पर्धेमध्ये समर्थ विद्यालय तथा समर्थ महाविद्यालय, लाखनीच्या कॅडेट्सनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले.

ज्युनियर डिव्हिजनचा कॅडेट दिशांत राऊत याने पाच राऊंड पाच सेंटीमीटर गोलाच्या आत फायर करत 'बेस्ट फायरर'चा बहुमान पटकावला. तर सीनियर डिव्हिजनचा कॅडेट तन्मय हुंमने यानेही पाच राऊंड दहा सेंटीमीटर गोलाच्या आत अचूक फायर करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या दोघांसोबतच कॅडेट सचिन बावणे यानेही उत्कृष्ट फायरिंग करत यश मिळवले.

या तिघा कॅडेट्सच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल गौतम कपूर, ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अजय कुमार, कॅम्प एडज्यूडंट कॅप्टन बाळकृष्ण रामटेके तसेच कंपनी कमांडर कॅप्टन प्रदीप लिचडे यांच्या हस्ते 'बेस्ट फायरर' म्हणून सन्मानित करण्यात आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष आल्हाद लाखनीकर, समर्थ विद्यालय मुख्याध्यापिका विभावरी निखाडे व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, प्राध्यापक मंडळ तसेच एनसीसी अधिकारी यांनी कॅडेट्सचे अभिनंदन केले.

0 Response to "CATC 611 शिबिरात समर्थ विद्यालयाच्या कॅडेट्सची फायरिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article