शालेय तालुकास्तर क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे आयोजन
मंगलवार, 29 जुलाई 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
"साप्ता.जनता की आवाज"
भंडारा :- तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सत्र 2025-26 आयोजनाच्या अनुषंगाने तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सभा सोमवारी जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे तसेच जे. एम.पटेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम,क्रीडा अधिकारी अभय महल्ले, क्रीडा अधिकारी निखिलेश तभाने,तुमसर तालुका क्रीडा अधिकारी स्नेहल चौगुले, जे.एम.पटेल कॉलेजचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.भीमराव पवार,राज्य क्रीडा मार्गदर्शक अविनाश निंबार्ते,राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रतीक लाडे,क्रीडा संघटक अरुण बांडेबुचे,माजी तालुका संयोजक श्याम देशमुख उपस्थित होते.
शालेय क्रीडा स्पर्धामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा व क्रीडा स्पर्धा खेळी मेळीच्या वातावरणात घेऊन यशस्वीरित्या पार पाडावे.असे जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे यांनी आवाहन केले.
तालुका क्रीडा अधिकारी अभय महल्ले यांनी सर्व खेळांबद्दल माहिती सांगून खेळाबद्दलच्या समस्या असल्यास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व सोडवण्याचे प्रस्ताविकातून आश्वासन दिले.
सभेसाठी प्रा.धनराज करचाल ,अंकित भगत, क्रीडा शिक्षिका शुभांगी येनोरकर, विलास पराते यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन भंडारा तालुका क्रीडा संयोजक बेनीलाल चौधरी यांनी केले असून आभार दिनेश कांबळे यांनी केले.यावेळी जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Response to "शालेय तालुकास्तर क्रीडा स्पर्धा नियोजन सभेचे आयोजन"
एक टिप्पणी भेजें