पनवेल महानगरपालिका च्या वतीने नवीन पनवेल येथील सेक्टर 1/S आंबेडकर भवन येथे पूरग्रस्त स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाष्ट्यात निघाल्या
बुधवार, 20 अगस्त 2025
Comment
• नागरिकांचे आरोग्य धोक्यात
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पनवेल :- परिसरामध्ये दोन दिवसापासून अतिवृष्टी होत असल्यामुळे सखलभागांमध्ये पुराचे पाणी आल्यामुळे नागरिक अडकले होते. अडकलेल्या नागरिकांना पनवेल महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले .नवीन पनवेल विभागातील सिद्धार्थ झोपडपट्टी मध्ये पाणी शिरल्याने तेथील रहिवाशांना नविन पनवेल येथील सेक्टर 1/S आंबेडकर भवन येथे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना जेवण ,अल्प उपहार ची सोय करण्यात आली होती .परंतु आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी देण्यात आलेल्या अल्पोपारहा अळ्या निघाल्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. वरील घटनेची माहिती कळतात
त्वरित घटनास्थळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले गट) पनवेल महानगर जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी केली आहे.
0 Response to "पनवेल महानगरपालिका च्या वतीने नवीन पनवेल येथील सेक्टर 1/S आंबेडकर भवन येथे पूरग्रस्त स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाष्ट्यात निघाल्या"
एक टिप्पणी भेजें