महामाया सामाजिक न्याय महिला संघटने कडून उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई मॅडम यांचा सत्कार
बुधवार, 20 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक की आवाज"
भंडारा :- महामाया सामाजिक महिला न्याय संघटना महाराष्ट्र यांनी साकोली येथील नवीन आलेले उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांचे गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला
व महिलांच्या सामाजिक व कार्यालयीन समस्या सोडविने
त्यांना कार्यालयात होणारा त्रास व वेळोवेळी डॉक्युमेंट साठी त्रास देणारे कर्मचारी यांना समज देऊन महिलांच्या समस्या सोडवावी असे मत महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष शितल नागदेवे यांनी चर्चा करताना उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांच्यासोबत मत व्यक्त केले
याप्रसंगी त्यांच्यासोबत महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डी जी रंगारी व पदाधिकारी रत्ना खंडारे ,ज्योती मेश्राम, आम्रपाली मोटघरे , व इतर महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "महामाया सामाजिक न्याय महिला संघटने कडून उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई मॅडम यांचा सत्कार "
एक टिप्पणी भेजें