-->
विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन 21 ऑगस्टला संजीव भांबोरे

विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन 21 ऑगस्टला संजीव भांबोरे


"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा- विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे करणार आहेत. या जन आक्रोश आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी, सन २००६ ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काल लागू करण्यात यावा, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे एकरी 50,000/ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर, श्रावण बाळ, विधवा महिला ,निराधार व अपंग यांना प्रति महिना 6000/ हजार रुपये देण्यात यावे व्यापारी फेडरेशन ला 5 किलो ओलावा घेतात ते रद्द करण्यात यावे, 15 ऑक्टोंबर पर्यंत धानाचे काटे सुरू करण्यात यावे, याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सततचे 4 ते 5 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक होत नाही त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पिकाच्या सामना करावा लागतो आणि वारंवार अवकाळी पाऊस पडतो व शेतकऱ्यां चे पीक भुईसपाट होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाच्या डोंगर उभा झालेला आहे .काही शेतकऱ्यांना गहाण ठेवून बँकेचे व सहकारी संस्थेचे कर्ज भरावे लागते. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आणि शेतकऱ्यांवर नाईराजास्त आत्महत्या करण्याची वेळ येत आहे . त्यामुळे शासनाने तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांचे जीव वाचवावे .त्याकरिता 21 ऑगस्ट 2025 ला शेतकरी जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन त्रिमूर्ती चौक भंडारा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. वरील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नम्रता बागडे,मनीषा भांडारकर,भाऊ कातोरे ,चरण शहारे, दिलीप ईखार ,पांडुरंग नंदागवळी ,चंद्रशेखर पडोळे , प्रकाश ठवकर, विनायक भोयर ,विनायक भोयर, दशरथ भोयर ,शामराव बडगे ,देवराम कातोरे, लिलाबाई अंबादे रमेश भोईर रामा टिचकुले, महादेव बडगे ,भाऊराव भोयर, हंसराज अंबादे,सुनंदा टिचकुले, रामकृष्ण वैद्य ,लक्ष्मी वैद्य ,ज्ञानेश्वर टिचकुले प्रफुल सुखदेव ,शरद बडगे ,सोपान ठवकर , मोरेश्वर देऊळकर ,सहादेव टिचकुले ,वनिता ठवकर ,रघुवीर टिचकुले सारू कानतोडे ,श्यामराव कावळे, मारुती वैद्य , मारुती कावळे, मुक्ता सुखदेवे, पार्वता चौधरी ,नीलकंठ टिचकुले ,परमेश्वर टिचकुले ,सुभाष टिचकुले सुधीर सुखदेवे ,गंगा वैद्य ,अशोक टिचकुले ,अस्मिता भोयर ,प्रल्हाद सुखदेवे ,भोलाराम ठवकर, सुरेश बडगे ,यांनी केलेले आहे.

0 Response to "विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन 21 ऑगस्टला संजीव भांबोरे"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article