शासकीय योजनांच्या नावाखाली महिलांची फसवणूक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
गुरुवार, 14 अगस्त 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा जिल्ह्यात गाव माझा उद्योग फाऊंडेशन या संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या योजनांच्या नावावर गत दोन वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातील महिलांची लाखो रुपयांनी वे फसवणूक करून खाजगी या फायनान्स कंपनीमधून कर्ज ही घेऊन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच वा उघडकीस आला आहे. याबाबत फसवणूक झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन फसवणूक करणाऱ्या संस्था पदाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
गाव माझा उद्योग फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक पवन
वानखेडे व त्यांचे सहकारी मुन्नादास, गायत्रीदास व भंडारा जिल्ह्यातील त्यांना सहकार्य करणाऱ्यांनी 'लखपती दिदी' या अभियानांतर्गत शासनाच्या योजनेच्या नावावर शेकडो महिलांना शासनाच्या वतीने निधी मिळवून रोजगार मिळवून देण्याचे सांगून प्रत्येक गावात गटबांधणी करायची या उद्देशाने गावातीलच काही महिलांना काही पदे देऊन त्यांना मानधन देऊ असे सांगण्यात आले. भविष्यात या रोजगारामधून चांगला फायदा मिळेल याचे
आमिष देण्यात आले, प्रत्येक महिलेकडून १००० रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन त्यांचे फार्म भरण्यात आले. त्यांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, बैंक अकाऊंट व ई-मेल आयडी कागदपत्र घेण्यात आले. मात्र, कुठलेही काम सुरू न झाल्यामुळे महिलांच्या मनात शंका निर्माण झाली. दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली. ग्रामीण भागातील जवळपास २०० गावातील महिलांकडून पैसे उकळून फसवणूक करण्यात आली.
तसेच कुठल्याही प्रकारचा मानधन देण्यात आला नाही. विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन कार्यालय बंद करून पसार झाले.
काही महिलांच्या नावावर बजाज फायनान्स मधून कर्ज उचलून अफरातफर करण्यात आली. रिना गुरुदेव राखडे रा. कोरंभी (देवी) यांचे नावे ८३ हजार रुपये कर्ज काढून गैरवापर केला. संस्थेकडून कर्ज परतफेड करण्यात टाळाटाळ केली. पोलिसात तक्रार देऊनही पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे. अखेर फसवणूक झालेल्या संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संस्थापक पवन वानखेडे, गायत्रीदास, मुनादास व त्यांना सहकार्य करणान्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली आहे.
0 Response to "शासकीय योजनांच्या नावाखाली महिलांची फसवणूक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन."
एक टिप्पणी भेजें