तिरुपती विद्यालय रेंगोळा /येथे 79 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा.
रविवार, 17 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
''साप्ता जनता की आवाज"
भंडारा :- पेंढरी(मोठी) तिरुपती विद्यालय तथा स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महा. रेंगोळा /मांगली येथे भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त प्राचार्य विलास वाघाये यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच जि. प. शाळा व तिरुपती विद्यालय तथा स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महा. रेंगो ळा येथे संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विलास वाघाये तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पौर्णिमा फुलेकर, माजी सरपंच भिकाजीं मोहतुरे, सुभाष वणवे, भास्कर काटगाये, राजानंद मेश्राम, सचिन वणवे, गोपाल धनगर,माजी सरपंच संगीता फुलेकर,मुख्याध्यापक जयेंद्र शेळके उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विदयार्थ्यांनी व जि. प. शाळेच्या विदयार्थ्यांनी देशभक्तीगीता वर आधारित कवायत सादर केली व गीत,भाषण सादर केले.तसेच एक पेड माँ के नाम अंतर्गत शालेय परिसरात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षl रोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ग्याणिराम धनगर यांनी, प्रास्ताविक अशोक रंगारी व आभार देवराम फटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय गरपडे, कु. पूनम चेटूले, मनोहर सुरसाऊत, उत्तम माने, टेकराम भेंसारे, नाना हलमारे, उत्तम वाघाडे,संजय झलके, भीमराज तितीरमारे व शालेय विदयार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Response to "तिरुपती विद्यालय रेंगोळा /येथे 79 वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा."
एक टिप्पणी भेजें