महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक तिरोडा संघटनेच्या कर्मचार्यांणी जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे यांची भेट घेऊन तालुक्यात होत,असलेल्या अनेक समस्यांचे निवेदन दिले.
शुक्रवार, 1 अगस्त 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
"साप्ता.जनता की आवाज"
गोंदिया/तिरोडा :-मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील संगणक परिचालक यांना त्यांच्या क्षेत्रात काम करत असतांना खुप काही अडचनी निर्माण होत आहेत,
त्या साठी त्यांनी आपल्या समस्या घेऊन संबंधित अधिकार्यांची भेट घेतली पण त्यांना अरेरावी च्या भाषेत उत्तर देत दुर्लक्ष केलं गेलं त्यामुळे संगणक परिचालक कर्मचाऱ्यांत आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते,
या साठी सर्व कर्मचारींनी जिल्हा परिषद सदस्य श्री.जगदिश बावनथडे यांना निवेदन देत अनेक मागण्या सांगितल्या तसेच अधिकारी कसे वागतात हे हि कळवले,
या वर जगदीश बावनथडे यांनी सर्व कर्मचारी यांना हमी दिली कि या विषयावर आपण जातिनं लक्ष देऊ आणी जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना भेटून समस्यांचे निराकरण करू कारण आपण सर्वच जनतेचे सेवक आहोत आणी जनतेच्या कामात अडथडा येत असेल तर त्या अधिकारींना आपण धडा शिकवू...! असे त्यांनी मत व्यक्त केले.
0 Response to "महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक तिरोडा संघटनेच्या कर्मचार्यांणी जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथडे यांची भेट घेऊन तालुक्यात होत,असलेल्या अनेक समस्यांचे निवेदन दिले."
एक टिप्पणी भेजें