-->
हिवरकर पोलीस   अकॅडमीच्या शिक्षकाला पैशाची  गर्मी ,शाळेतीलच मुलीशी जातीयवादी वर्तणूक करून मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार

हिवरकर पोलीस अकॅडमीच्या शिक्षकाला पैशाची गर्मी ,शाळेतीलच मुलीशी जातीयवादी वर्तणूक करून मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार

• सोशल मीडियावर व्हाईस क्लिप व्हायरल 

• पत्रकार संजीव भांबोरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी केली चर्चा 

• समाजातील कार्यकर्त्यांच्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या भावना 

संजीव भांबोरे 
भंडारा :- अड्याळ पोलीसअंतर्गत येत असलेल्या हिवरकर पोलीस अकॅडमी चे संचालक व त्याच शाळेत पेशाने शिक्षक असलेले नितेश हिवरकर या शिक्षकाने शाळेतीलच विद्यार्थिनी सोबत 28 जुलैला रात्री साडेआठ वाजता जातीयवादी  शब्दाचा वापर करून मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्या मुलीला पैशाची गर्मी दाखवून तुझ्या माय बापाला मीच विकत घेऊ शकतो एवढा पैसा माझ्याकडे आहे तुला जे काही संबंध ठेवायचे असतील ते माझ्यासोबतच ठेव मायऱ्या  मुयऱ्या मुलासोबत संबंध ठेवू नकोस नाहीतर तुझ्या गेम केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची एक व्हाईस रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाली असून या संबंधात अड्याळ पोलीस स्टेशन येथे फिर्यादी शुभम लोणारे नवेगाव बाजार वय 27 यांच्या तक्रारीवरून आरोपी नितेश हिवरकर वय 40 यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन अड्याळ येथे
भारतीय न्याय संहिता बीएनएस 2023-75(2), भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023-352,  , भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023- 351(2) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989, , अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम 1989 3(1ं )(S) या विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल झाला असून आरोपीला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेले आहे.  त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे. याविषयी पत्रकार संजीव भांबोरे यांनी मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतले असत्या त्यांना समाजात जातीय तेढ निर्माण करून दोन समाजात दुपारी निर्माण करण्याचा हा एक प्रकार असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले व अशा प्रकारे वर्गातीलच मुलींची गैरवर्तन करून तिला एक ब्लॅकमेल करण्याचा हा हा त्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिदाम यांच्याशी पत्रकार संजीव भांबोरे यांनी चर्चा केली असता आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी विरुद्ध कलमाद्वारे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असल्याचे व आरोपीला अटक सुद्धा करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम करीत आहेत.

1 Response to "हिवरकर पोलीस अकॅडमीच्या शिक्षकाला पैशाची गर्मी ,शाळेतीलच मुलीशी जातीयवादी वर्तणूक करून मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार "

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article