भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्या. भंडारा च्या वतीने दुग्ध उत्पादकांचा चर्चा सत्र मेळावा व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सभारंभ कार्यक्रम संपन्न
रविवार, 10 अगस्त 2025
Comment
संकटावर मात करुन दुग्ध संघ करीता चांगले काय करता येईल याकडे विशेष लक्ष्य देण्याची गरज आहे. - आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन.
भंडारा :- दिनांक 10 आगस्ट 2025 रोज रविवार ला भंडारा येथे भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्या.भंडारा च्या वतीने दुग्ध उत्पादकांचा चर्चा सत्र मेळावा व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी :- मा.श्री.राजू माणिकरावजी कारेमोरे आमदार तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. तसेच
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- मा. श्री. परिणयजी फुके आमदार विधानपरिषद महाराष्ट्र.
प्रमुख पाहुणे :- मा.श्री.सुनीलजी फूंडे अध्यक्ष भंडारा जिल्हा मध्यवर्ती बैंक भंडारा,
मा.श्री.नानाभाऊ पंचबुधे माजी राज्यमंत्री.
मा.श्री.मधुकरजी कुकडे माजी खासदार तसेच
मा.श्री.धंनजय दलाल प्रदेश महासचिव ncp महाराष्ट्र
मा.श्री.एकनाथ फेंडर उपाध्यक्ष जि.प.भंडारा तसेच मा. श्री.प्रदीप पडोळे संचालक BDCC भंडारा,मा. श्री. आशु गोंडाने जिल्हा अध्यक्ष बीजेपी भंडारा,श्री.शिवराज गिरोपुंजे,श्री.शरदजी इटवले तसेच पदाधिकारी उपस्थित होते.तसेच सर्व नवनिर्वाचित संचालकांचा शाल श्रीफल पुष्प गुच्छ देऊन सत्कार प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रास्ताविक नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.विलासजी काटेखाये भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ भंडारा यांनी केले. तसेच विविध समस्यावर चर्चा सुद्धा करण्यात आली. त्यावर आपण प्रामाणित काम करुन सर्वानी सहकार्य करुन भंडारा जिल्हा दुग्ध संघाला गतिमान करावे व शासनाकडून आमची काही मदत लागली तर आम्ही आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे.अस वक्तव्य आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी केले.
0 Response to "भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्या. भंडारा च्या वतीने दुग्ध उत्पादकांचा चर्चा सत्र मेळावा व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सभारंभ कार्यक्रम संपन्न"
एक टिप्पणी भेजें