तुमसर शहरात विस सार्वजनिक गणपतींची स्थापना ढोल ताशांच्या गजरात गणपतीं बाप्पांचे आगमन.
गुरुवार, 28 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- वर्षगणिक सार्वजनिक गणपतीची संख्या वाढत चालली आहे. एकट्या तुमसर तालुक्यात पन्नासावर सार्वजनिक श्री गणेशांची स्थापना झालेली आहे. सुगीचे शेती हंगामाने गणेशोत्सवाच्या आनंदात भर घातली आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण परिसरात सुध्दा गणपती बाप्पांचे आगमन ढोल-ताशांच्या गजरात झाले.
नियमित पडलेला पाऊस शेतीला सुगीचे दिवस घेऊन आला आहे. यंदा शेती भरघोष पीक देणार हे हेरून शेतकरी शेतमजूर यांनी हात सैल सोडले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापार-उदीम यांना बरे दिवस आले. सणावारांची रेलचेल सर्वांनाच आनंद देत पुढे चालली आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवात भर पडत चालली आहे. शहर २०
च्या आसपास पोहचली आहे. खाजगी गणपती मांडणाऱ्यांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. पालिकेने मूर्तिकारांना योग्य जागा न दिल्याने अडचणीच्या जागी विक्री करावी लागली. दहा दिवसाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मुर्त्यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. फळ, फुले, पत्री यांचे अतिरिक्त बाजार सुरू झाले आहेत, भक्ती जरुर वाढावी, मात्र त्याचा बाजार होता कामा नये. यासाठी कोणाचेही लक्ष नाही. भजन पूजनाचे कार्यक्रमांसह लोकशिक्षण आणि लोकजागृतीचे कार्यक्रम होणे महत्त्वाचे परंतु, तसं दिसत नाही. सार्वजनिक उत्सव म्हणजे ध्वनी प्रदूषणाचे उत्सव ठरत आहे. कारण आवाजावर नियंत्रण ठेवणाऱ्यांना मॅनेज केले जाते असे अनेक नमुने पहावयास मीळतात.
शासनाने राज्योत्सव दर्जा दिला आहे.
यावर्षी गणेशोत्सवाला शासनाने राज्योत्सव दर्जा दिला आहे. ओपरेशन सिंदूर, स्वदेशी वृक्षलागवड, व्यसनमुक्ती
यासारख्या सामाजिक उपक्रमांना चालना द्यावी. त्याचबरोबर गाणे कोणते वाजवायचे कोणते वाजवू नये, यावरही निर्बंध असणे महत्त्वाचे आहे. डिजेच्या आवाजावर मंडळांनी नियंत्रण ठेवावा नाहीतर कारवाईस समोर जावे लागेल,अशी तंबी प्रशासनाने मंडळाला दिली.
भावी आनंदा उत्सव,प्रदूषणाचा उत्सव नको?.
भावी आनंदाचा उत्सव एकतेचा संदेश देणारा असून ज्ञानाच प्रति आहे.परंतू तसे पाहावयास मीळत नाही.अलिकडे गणेश उत्सव राहिला नसून प्रदूषणाचा उत्सव आहे. ते आपण पाहतो आहे. गणेशजींच्या आगमनावर लाखों रुपये खर्ची पडतो मग आपली संस्कृती कुठे चालली, याचा विचारवंतांनी किंवा मंडळांनी यावर आत्मचिंतन केले आहे का?
गणपती उत्सव करीता पोलीस खात्याने कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर निर्बंधाची अंमलबजावणी मंडळांकडून होत आहे काय? यावर सुध्दा नजर ठेवून आहेत. जवळपास ६० कर्मचारी तैनात आहेत. त्याचबरोबर सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव व पोलीस निरीक्षक गायकवाड आणि कर्मचारी मंडळांवर नजर राखून आहेत.
तसेच ठीक ठिकाणी बापाचे दर्शनासाठी जत्रेचे रूप धारण होते त्यामुळे भाविकांना सुखरूप दर्शन व्हावे तसेच डीजेच्या ध्वनी प्रदूषण घाणीचे साम्राज्य शहरात पसरू नये व सामान नागरिकांना कोणत्याही त्रास होऊ नये यासाठी नगरपालिका प्रशासनाने ठोस पाऊल उचलून सुखकर मार्ग मोकळा करावा अशी भाविकांची शहरवासी यांची मागणी आहे.
0 Response to "तुमसर शहरात विस सार्वजनिक गणपतींची स्थापना ढोल ताशांच्या गजरात गणपतीं बाप्पांचे आगमन."
एक टिप्पणी भेजें