
तुमसर येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त पतसंस्थांचे प्रशिक्षण
गुरुवार, 28 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज" वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधत तालुक्यातील पतसंस्थांचे प्रशिक्षण कार्यक्रम दि. २९ ऑगस्ट रोजी सहयोग सहकारी पतसंस्था कार्यालय तुमसर येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमांचे अध्यक्ष सहयोग सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तारीक कुरैशी, कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा शुध्दोधन कांबळे, सहाय्यक निबंधक
सहकारी संस्था तुमसर प्रमोद हूमने, प्रशिक्षक व मार्गदर्शक लेखापरीक्षक सहकारी संस्था रंजित उके, सहकार अधिकारी संजय गायधने, गिरीष धोटे, सुधिर शेंद्रे, धारा कोवे, कर्मचारी मुलचंद नागपुरे व आदी मान्यवरांच्या उपस्थित सदर कार्यक्रम पार पडणार आहे.
कार्यक्रमात सदर जास्तीत जास्त पतसंस्थेच्या व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रमोद हूमने यांनी केले.
0 Response to "तुमसर येथे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त पतसंस्थांचे प्रशिक्षण"
एक टिप्पणी भेजें