-->
कर्मचाऱ्यांचे वारसानाला नोकरी साठी माराव्या लागतात चकरा !..

कर्मचाऱ्यांचे वारसानाला नोकरी साठी माराव्या लागतात चकरा !..

शासनाची बघाची भुमीका ! न.पा.प्रशासनाचा भोगंळ कारभार.

• वारसानांना नियमानुसार सेवेत समाविष्ट करा -- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्त प्रतिनिधी 

तुमसर :-  तुमसर नगर परिषदेतील सेवानिवृत्त झालेले स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्वकीय वारसहक्काने मिळणाऱ्या नोकरीच्या प्रतिक्षेत असुन नगर परिषद प्रश-ासनातर्फे त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने तुमसर नगर परिषद प्रशासना विरुद्ध संताप संताप व्यक्त केला जात आहे.

१९७२ साली महाराष्ट्र सरकारने लाड-पागे समित्तीची स्थापना करून समितीच्या शिफा-रशी नुसार १९७४ वर्षापासून सफाई काम करणारे अनुसूचित जातीच्या कुटूंबातील व्यक्तींना वारस हक्काने नोकरी देण्याची तरतूद केली आहे.

तसेच राज्य शासनाने वेळो वेळी सफाई कामगारांच्या हितात फेरबदल करून सफाई कामगारांना दिलासा दिला आहे. असे असूनही तुमसर नगर परिषद येथील

जी.आर. म्हणतो वारस हक्क द्या, मात्र तुमसर नगर परिषदेची टाळाटाळ ?

महाराष्ट्र शासनाच्या जी.आर. नुसार नगर परिषदेतील अस्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकेत पदनाव जरी काहीही नमूद असले तरी त्यांना लाड-पागे समिती अंतर्गत वारेस हवक द्या असे जी.आर. म्हणते. मात्र नगर परिषद तुमसर टाळाटाळ का करत आहे? हे समजणं सेवानिवृत कर्मचारी व त्यांच्या वारसाच्या डोक्या पलीकडचे झाले आहे.

माझे वडील तुमसर नगर परिषदेतून सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त झालेत. मात्र त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये कुली असा उल्लेख आहे.जिआर म्हणतो की कामगारांने अस्वच्छतेचा कामे केली असल्यास त्याला लाड पांगे समिती अंतर्गत वारस हक्का प्रमाणे नौकरी देण्यात यावी. करिता नगर परिषद येथे अर्ज केले आहे. मात्र आज पर्यंत मला एकही उत्तर किंवा प्रतिसाद मिळाले नाही. मी जिल्हयातील इतर नगर परिषदेत माहिती घेतली असता. तेथे जिआर नुसार वारसानांना नौकरित समाविष्ट करत आहेत. मात्र तुमसर नगर परिषद का करत नाही असा प्रश्न पडला आहे ?

सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांचे वारसाण

सेवानिवृत्त होईपर्यंत अस्वछतेचा काम करणारे कर्मचाऱ्यांचे वारस

आपल्या हक्काच्या नोकरीसाठी कार्यालयाच्या चकरा मारत फिरत
आमचे "सापताहीक जनता की आवाज" प्रतिनीधी नी.जुम्मा प्यारेवालले मुख्याधिकारीशी संपर्क केले असता 
या "संदर्भात फाईल वरिष्ठांकडे मार्गदर्शनाला पाठविले आहे. जो काही निर्णय येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल." असे कळले.त्यामुळे प्रशासन बद्याची भुमीका घेत

असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे तुमसर नगर परिषदे वर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहेत. तुमसर नगर परिषद प्रश-ासनाच्या या भोंगळ कामामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या डोक्याचे तीळपापड झाले आहे. आणि त्यांच्यात प्रशासनाबद्दल रोम असल्याचे चित्र दिसून येत आहे

करिता नियमानुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नगर परिषद येथे वारस हक्का प्रमाणे नोकरी देण्याची मागणी सेवानिवृत्त सफाई कर्मचारी करत आहेत.

0 Response to "कर्मचाऱ्यांचे वारसानाला नोकरी साठी माराव्या लागतात चकरा !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article