-->
वंचित बहुजन आघाडी तर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर,पॅनकार्ड,आधारकार्ड तसेच रेशनकार्ड शिबिराचे आयोजन.

वंचित बहुजन आघाडी तर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर,पॅनकार्ड,आधारकार्ड तसेच रेशनकार्ड शिबिराचे आयोजन.


सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

उल्हासनगर :- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते..
सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम वंचित बहुजन आघडी तर्फे उल्हासनगरात दि 16,17 रोजी आरोग्य शिबिर,पॅनकार्ड आधार कार्ड तसेच राशन कार्ड अश्या विविध प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी याचा लाभ घेतला असून उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्र अहिरे (माही) यांच्या पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
  आरोग्य शिबिरात सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या गेल्या.यामध्ये प्रामुख्याने बी.पी.,शुगर, डोळ्यांची तसेच हाडांची तपासणी केली गेली.यावरील औषधे मोफत देण्यात आली.
सदर शिबिराला वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.उल्हासनगर शहर मान.अध्यक्ष शेषराव वाघमारे,महिला उपाध्यक्ष वंदना अवचार,माजी अध्यक्षा संगीता नेतकर,संघटक देवानंद शिरसाट, उपाध्यक्ष प्रकाश इंगळे,वॉर्ड अध्यक्ष युवराज भगत,वॉर्ड अध्यक्ष दिपक आढाव,सविता संगारे, कमलाताई पोहोरकर ॲड प्रशांत चंदनशिव आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Response to "वंचित बहुजन आघाडी तर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर,पॅनकार्ड,आधारकार्ड तसेच रेशनकार्ड शिबिराचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article