बालविवाह अल्पवयीन मुलीवर,अत्याचार सात महिन्याची गर्भधारणा ,आरोपीत आई वडील सह सासू सासरे पतीवर करडी पोलिसात गुन्हा दाखल.
रविवार, 17 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
मोहाडी :- तालुक्यातील करडी पोलिसात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून तिच्यावर अत्याचार करुन गर्भधारणा करणाऱ्या आरोपी पतीसह सासू सासरे आई वडील यांचेवर गुन्हा दाखल केला आहे सदरील घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशन चा हद्दीतील असल्याने सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून दवनिवाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे
यातील फिर्यादी अल्पवयीन पीडित निशा (नाव बदलले) ही अल्पवयीन असल्याचे आरोपी प्रल्हाद शलिकराम शिवणकर (40) वडील लता शालिक राम शिवणकर (35) आई राअर्जुनी त तिरोडा जि गोंदिया, प्रकाश शालीकराम शेंदरे (40) सासरे, गीता प्रकाश शेंदरे (35) सासू, अक्षय प्रकाश शेंदरे (17) पती रा खांबा/जांभली त साकोली हल्ली मुकाम नरशिहटोला त मोहाडी यांना माहीत असताना सुद्धा पिडितीचा लग्न लाऊन दिल्याने आरोपीपती ने शारीरिक संबंध ठेवल्याने ती अल्पवयात गर्भ वती झाल्याने बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 व लैंगिक गुन्हा पासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 तसेच पासको कायद्या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास करण्या करिता पोलीस स्टेशन दवनीवाडा जिल्हा गोंदिया कडे वर्ग करण्यात आला आहे
0 Response to "बालविवाह अल्पवयीन मुलीवर,अत्याचार सात महिन्याची गर्भधारणा ,आरोपीत आई वडील सह सासू सासरे पतीवर करडी पोलिसात गुन्हा दाखल."
एक टिप्पणी भेजें