पुन्हा साकोली मुख्य शहराचे प्राचीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार होणार
शुक्रवार, 22 अगस्त 2025
Comment
तान्हा पोळ्याला होणार भूमिपूजन व शुभारंभ सोहळा
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- ब्रिटिशकालीन राजवटापासून असलेले साकोली तहसिल आणि तेच मुख्य शहर म्हणजे गणेश वार्ड. येथील ऐतिहासिक वैभव प्राप्त असलेल्या पुरातन मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य ईश्वरानेच काही होतकरू स्थानिक निवासींना जणु "आशिषं" म्हणजे आशिर्वादच दिला आहे. मागे ऐतिहासिक प्राचीन १३२ वर्ष जूने श्री गणपती मंदिराचे जिर्णोद्धार सोहळा झाला व या गणेशोत्सव नंतर नव्या मंदिराचे बांधकामाला सुरुवात केली जात आहे.
असेच एक प्राचीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हे त्या काळातील आमदार स्व. शामरावबापू कापगते यांच्या निवासस्थान परीसरात आजही जीर्ण अवस्थेत उभे आहे. येथे प्राचीन काळापासून त्या वेळचे शिक्षण महर्षी स्व. नंदलाल पाटील कापगते, स्व. भैयाजी पाटील कापगते, ब्रिटिशकालीन तहसिलदार स्व. शंकरराव शिवाजी अंदूलकर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. उमराव सिंह जव्हेरी, जूने दिवाणी न्यायालय अधिक्षक स्व. रामचंद्र पाटील कापगते, स्व. पांडूरंगजी उजगांवकर, ब्रिटिशकालीन ठाणेदार अर्थात दरोगा स्व. संपतसिंह सिडाम आणि जूने व्यक्ती याच चौकात तान्हा पोळा भरवित असत. त्या काळात दिवे नसून चौकाचौकात रात्री प्रकाशासाठी मशाली ठेवल्या जात होत्या. ही माहिती मला मी ६ वीत असतांना माझे आजोबा स्व. शंकरराव शिवाजी अंदूलकर हे सन १९९४ ला रात्री जेवल्यानंतर झोपताना जुन्या गोष्टी सांगत असत. एवढे प्राचीन वैभव या गणेश वार्ड शहरात आहे म्हणूनच काही जागृत निवासींनी या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धाराचा जणू विडाच उचलला आहे. येथे उद्या शनिवार २३ ऑगस्टला सायं. ०५ वाजता त्याच तान्हा पोळा अविस्मरणीय आठवणी निमित्ताने या सुद्धा मंदिराचे जिर्णोद्धार पुजन सोहळा संपन्न केला जातो आहे. ही आपल्या ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी तहसिल साकोली शहरासाठी गौरवाची बाब आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन "प्राचीन मंदिर जिर्णोद्धार समिती" च्या जागृत स्थानिक जनतेने केले आहे.
0 Response to "पुन्हा साकोली मुख्य शहराचे प्राचीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार होणार"
एक टिप्पणी भेजें