पिपरी पुनर्वसन ग्रामपंचायत कार्यालय येथे तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवड, संदीप तितिरमारे बहुमताने विजयी
शुक्रवार, 22 अगस्त 2025
Comment
" साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन
भंडारा: - तालुक्यातील पिपरी पुनर्वसन ग्रामपंचायत कार्यालय येथे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवडणूक पार पडली. यात संदीप तितिरमारे बहुमताने निवडून आले. विरोधी उमेदवार नीलकंठ ठवकर यांचा संदीप तितिरमारे यांनी 40 मतांनी पराभव केला. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष भाऊ कातोरे, चिंटू तिजारे, शंकर कारेमोरे, कवडु वाडई, भगवान लांडगे, अनिल लांडगे, प्रोजोत घुले, भाऊराव ठवकर, नाना ढेगे व अनेक मान्यवरांच्या हस्ते संदीप तितिरमारे हे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
0 Response to "पिपरी पुनर्वसन ग्रामपंचायत कार्यालय येथे तंटामुक्ती समिती अध्यक्षाची निवड, संदीप तितिरमारे बहुमताने विजयी "
एक टिप्पणी भेजें