डॉक्टर आंबेडकर हे ज्ञान व मानवी हक्काच्या संघर्षामुळे जगविख्यात : डॉ. प्रदीप आगलावेनागपूर
रविवार, 3 अगस्त 2025
Comment
दिगंबर देशभर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- जगात ज्ञान आणि वैचारिक संपत्ती हीच सर्वश्रेष्ठ मानली जाते.
बुद्धांचा धम्म हा तत्वज्ञान व विज्ञानवादामुळे जगात पोहोचला. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या ज्ञान व मानवी हक्कासाठी त्यांनी केलेल्या संघर्षामुळे विश्वव्यापी बनले. डॉ. बाबासाहेबांचे कार्य दिशादर्शक असल्यामुळे याचे जतन करणे काव्ळाची गरज आहे. हे कार्य मागील 50 वर्षापासून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती' करत आहे. 15 मार्च 1976 रोजी स्थापन झालेल्या प्रकाशन समितीच्या कार्यात सुरुवातीपासून अनेक अळ्थडे, संकटे येत गेले. त्यामुळे मागील 35 वर्षात केवळ 22 खंड प्रकाशित होऊ शकले. परंतु मागील 4 वर्षात अत्यंत महत्वाचे ग्रंथ,
साहित्य निर्माण झाले आहे. असे जेष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समीतीचे सचीव डॉ. प्रदिप आगलावे यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाच्या प्रकाशनाची वस्तुस्थिती' या विषयावर बोलताना विचार व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते नरेश धोपटे यांच्या निवासस्थानी दर गुरुवारी होणाऱ्या धम्म संगोष्ठीच्या 353 व्या सभेत डॉ. प्रदीप आगलावे बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रा. यशवंत दुपटे होते. स्मृतीशेष वसंत मून सोबत काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली. साहित्य निर्मितीची प्रक्रिया मी स्वतः अनुभवली. वसंत मून यांनी घेतलेले अपार कष्ट मी जवळून पाहिले. तत्कालीन समीतीत गणमान्य व्यक्ती होते. मून यांना काम करून घेण्याची कला अवगत होती. त्यामुळे ते साहित्य, खंड निर्माण करू शकले. तशीच कला डॉ. प्रदीप आगलावे यांच्याकडे आहे.
डॉ. बाबासाहेबांच्या साहित्य निर्मितीची पायाभरणी वसंत मून यांनी केली. त्यावर कळस चढवण्याचे कार्य आगलावे करत आहेत, असे प्रा. यशवंत दुपटे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला बहुजन सौरभच्या निवासी संपादक संध्या राजुरकर, डॉ. सरोज आगलावे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुनील भगत यांच्या धम्मगीताने झाली. संचालन श्रीराम बनसोड यांनी केले तर सुनीता रणधीर यांनी आभार मानले.
0 Response to "डॉक्टर आंबेडकर हे ज्ञान व मानवी हक्काच्या संघर्षामुळे जगविख्यात : डॉ. प्रदीप आगलावेनागपूर "
एक टिप्पणी भेजें