-->
 खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


श्रीकृष्ण देशभ्रतार 

नागपूर :- महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले आहे. खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहे. 

जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी आवश्यक आहे. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्यात येत असून दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धे त मिळविलेले देदीप्यमान यश हे देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रैंडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. तसेच खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही सन्मान करण्यात आला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री संदीप जोशी, अभिजित वंजारी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. परिणय फुके, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली उगले, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख, आई डॉ. नम्रता देशमुख, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित जिल्हा संघटनांचे पदाधिकारी, बुद्धिबळपटू, विद्यार्थी व नागपूरकर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिव्याने कमी वयात लक्ष विचलित न होऊ देत ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. बुद्धिबळात उत्स्फूर्तता, एकाग्रता आणि सजगता आवश्यक असते. बुद्धिबळ हा खेळ शंभरावर देशात खेळला जातो. त्यामुळे दिव्याने गाठलेले यश मोठे आहे. बुद्धिबळात चीनचे वर्चस्व राहायचे. चीनचे हे वर्चस्व जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख हिने धडक देत मोडून काढले. यात दिव्याने अंतिम फेरीत वयाच्या केवळ १९ व्या वर्षी विजय मिळविला.

0 Response to " खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article