थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून सातबारा कोरा करा !.
सोमवार, 25 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
• नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये द्या.. मुख्यमंत्र्यांना निवेदन....
भंडारा :- महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सरकार सत्तेत आल्यावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून सातबारा कोरा करू असे सत्तेत असलेले आमदार, मंत्र्यांनी यांनी आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन बराच काळ लोटून गेला परंतु अजून पर्यंत एकाही शेतकऱ्याचा कर्जमाफ झालेला नाही व सातबारा कोरा केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मोर्चे, धरणे, आंदोलन, सुरू आहेत. शेतकरी मार्च महिन्यात इकडून तिकडून पैसे मागून सरकारचा नियमित कर्ज भरतो कधीही कर्ज बाकी ठेवत नाही अशा शेतकऱ्यांचा शासन व आंदोलन करणारे नेते विचार करत नाही. ही अत्यंत वेदनादायी बाबा आहे. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. म्हणून आज दिनांक 25/ 8/ 2025 रोजी नवनियुक्त जिल्हाधिकारी सावंतकुमार भंडारा यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांना अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, भास्कर साकोरे, चैतराम कोकासे यांनी निवेदन दिले की थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ करून सातबारा कोरा करा परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय न करता हेक्टरी एक लाख रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात यावे.असे निवेदन देण्यात आले. यावेळी कोठराम पवनकर, नितेश बोरकर ,दशरथ सहारे, तसेच शेतकरी उपस्थित होते.
0 Response to "थकीत असलेल्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ करून सातबारा कोरा करा !. "
एक टिप्पणी भेजें