डॉ.प्रशांत चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर
सोमवार, 25 अगस्त 2025
Comment
• 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त खासदार निलेश लंके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अहिल्यानगर :- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था,श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पै.नाना डोंगरे व्यायाम शाळा निमगांव वाघा, ता.जि. अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने,आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2025 दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त निमगाव वाघा येथील परिवार मंगल कार्यालयात संपन्न होणार असून आपल्या कार्याची पावती म्हणून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्यभरातून पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सोजाई आदिवासी महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष तथा संत तुकाराम मल्टी स्पेशलिटी शिवकृपा हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डायरेक्टर प्रशांत डी चव्हाण यांना देखील राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर झाला असून 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त खासदार निलेश लंके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे डॉक्टर प्रशांत चव्हाण यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचं संस्थेचे अध्यक्ष पै. नानाभाऊ डोंगरे यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे.
0 Response to "डॉ.प्रशांत चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर"
एक टिप्पणी भेजें