समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न.
रविवार, 3 अगस्त 2025
Comment
नरेन्द्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- दि. १ ऑगस्ट २०२५ – समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज भगिनी निवेदिता सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागातून "आपले विद्यार्थी, आपले वक्ते" हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. धनंजय गभने होते. प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संगीता हाडगे, डॉ. बंडू चौधरी, प्रा. बाळकृष्ण रामटेके, डॉ. भास्कर पर्वते व्यासपीठावर उपस्थित होते.
"आपले विद्यार्थी, आपले वक्ते" या विशेष उपक्रमांतर्गत प्राप्ती कामथे, वैष्णवी मेश्राम, अंजली कांबळे, जान्हवी सोनटक्के, हर्षा ठवकर, श्रेया मते, यशस्वी कुथे, तृप्ती पारधी, ट्विंकल चानोरे आणि वैष्णवी करंजेकर या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाष्य केले. या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून विचारप्रवृत्त करणारा संदेश दिला.
अध्यक्षीय भाषणात डॉ. धनंजय गभने यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की, “मोबाईलपेक्षा पुस्तके अधिक चांगले मित्र आहेत. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा. वाचनातूनच विचारांचा विस्तार होतो.” असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. कीर्ती शेंडे यांनी तर प्रास्ताविक प्रा. अजिंक्य भांडारकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पूजा नवखरे यांनी केले.
0 Response to "समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम संपन्न."
एक टिप्पणी भेजें