मिथुन चक्रवर्ती ३८० चित्रपटात अभिनय करणारा...
शनिवार, 30 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुबंई / नागपूर :- सुपरस्टार बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी अलीकडेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की एका काळात त्यांच्या तब्बल ६५ चित्रपटांची शूटिंग एकाचवेळी सुरू होती. एका खास मुलाखतीत ८०-९० च्या दशकातील कामाच्या अनुभवाविषयी बोलताना मिथुन म्हणाले, 'तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण एका वेळेस माझ्या ६५ चित्रपट फ्लोअरवर होते. माझ्या नावावर एका वर्षात १९ चित्रपट रिलीज़ करण्याचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
आजपर्यंत मी सुमारे ३८० चित्रपट केले आहेत असे ते म्हणाले.
मिथुन यांनी आपल्या अलीकडील 'द बंगाल फाईल्स' चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादाबद्दलही मोकळेपणाने मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'जसे तुम्ही सत्य दाखवता ते लगेच राजकारणाशी जोडले जाते.
आश्चर्य म्हणजे कोणीही खरी गोष्ट ऐकू इच्छित नाही. नोवाखाली येथे ४० हजार हिंदूंचा नरसंहार झाला होता. कलकत्ता नरसंहारातही हजारो लोक मारले गेले, पण आज कोणी याबद्दल बोलत नाही. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात 'सत्य जाणून घ्या' पण जेव्हा कुणी सत्य सांगतो तेव्हा त्याला राजकारणाशी जोडले जाते, असे ते म्हणाले.
0 Response to " मिथुन चक्रवर्ती ३८० चित्रपटात अभिनय करणारा..."
एक टिप्पणी भेजें