तुमसरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा
शनिवार, 30 अगस्त 2025
Comment
"सापताहीक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
तुमसर :- प्रतिष्ठान, तुमसर व पोलिस स्टेशन तुमसर यांच्या संयुक्त विद्यमानातून पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या हाकेला साथ देत तुमसर शहरातील विविध सामाजिक कार्यात तत्पर असणारी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर यांनी पुढाकार घेत स्पर्धेचे नियोजन केले. स्पर्धेची सुरुवात गणेश चतुर्थी पासून विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांच्या आगमनाने सुरू करण्यात आली.
पर्यावण समतोल राखने गरजेचे.
पर्यावरण समतोल, वृक्षारोपण, पाण्याच्या नैसर्गिक
स्रोताचे रक्षण, बाल संस्कार शिबिर, आरोग्य शिबिर, शासकीय योजनेची माहिती, सामाजिक सलोखा, शिस्तबद्धता भक्तीसोबत जबाबदारीची साथ अशाप्रकारे तुमसर शहरातील सर्व गणपती उत्सव मंडळाला पोलिस स्टेशन तुमसरचे पो. नि. संजय गायकवाड, गिरीश पडोळे, सुनील सेलोटे व पोलीस कर्मचारी सोबत छत्रपती
शिवशंभू प्रतिष्ठान तुमसरचे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे, सचिव प्रा. अमोल उमरकर, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, उपाध्यक्ष विक्की साठवणे, हौसीलाल ठाकरे, नितीन सार्वे, सोनू दुपारे, मनोज बोपचे, समीर जावळकर, अभिषेकसिंग ठाकूर व संपूर्ण टीम ने भेट देत उपक्रमाविषयी संपूर्ण माहिती दिली. (ता.प्र
0 Response to "तुमसरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा "
एक टिप्पणी भेजें