-->
भंडारा-वरठी मार्गावर दिसतोय मृत्यू , लोकप्रतिनिधींची बघांची भूमिका !..

भंडारा-वरठी मार्गावर दिसतोय मृत्यू , लोकप्रतिनिधींची बघांची भूमिका !..

 

• जागोजागी खड्डेच खड्डे; यंत्रणा अजूनही गप्पच.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- भंडारा-वरठी हा वर्दळीचा मार्ग. परंतु, या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे यापूर्वी अनेक अपघात या मार्गावर घडले आहेत. आता पावसाळा सुरू आहे. रस्ता दुरिस्तीकडे यंत्रणेचे लक्ष नाही. त्यामुळे कधीही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

भंडारा ते वरठी हा मार्ग तुमसर, मोहाडीकडे जाणारा आहे. तिथूनच तिरोडा मार्गे गोंदियालाही जाता येते. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या मार्गावर वाहनचालकाची ये-जा सुरूच असते. वर्दळीचा हा रस्ता आहे. परंतु, कोणत्याची लोकप्रतिनिधींचे किंवा संबंधित विभागाचे रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष गेले नाही. या रस्त्याची इतकी बिकट अवस्था असताना लोकप्रतिनिधी

का दुर्लक्ष करतात, हे न उलगडणारे कोडेच आहे. दाभा, जमनी आणि पुढे वरठीलगत रस्ता जागोजागी पूर्णपणे उखडलेला आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्यास वाहनचालकाचा खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन थेट खड्ड्यांत जाते आणि अपघात घडतो. अनेक वाहनचालक या खड्ड्यांमुळे

अपघातग्रस्त झाले आहेत. काहींना अपंगत्व, तर काहींचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे यंत्रणेसह

लोकप्रतिनिधींनीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

भंडारा ते वरठी मार्ग तसेच बायपास रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण केव्हाचेच निघाले आहे. त्यामुळे वाहन केव्हा कोणत्या खड्ड्यात जाईल याचा नेम नाही. अनेक ऑटो या रस्त्यात उलटले, वाहनांचे टायर फुटले, ट्रक नादुरुस्त झाले. आता मोठ्या अपघाताची वाट प्रशासन पाहत आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत राष्ट्रवादी काँग्रेस

शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांना निवेदन दिले. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. निवेदन देताना अध्यक्ष गीतेश ठोंबरे, मनीषकुमार राऊत, मधू चौधरी, नीतेश मारवाडे, मधुकर भोपे, राहुल भोंगाडे, संजय गायधने, तुषार लांजेवार, शाहिना खान, नीलिमा रामटेके, लता बावनकुळे, रुपेश साठवणे, विकास बडवाईक, राजा खान, मंगेश काटकर उपस्थित होते.


0 Response to "भंडारा-वरठी मार्गावर दिसतोय मृत्यू , लोकप्रतिनिधींची बघांची भूमिका !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article