जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावणे थांबवा आझाद समाज पक्ष, जनआंदोलनाचा इशारा.
मंगलवार, 19 अगस्त 2025
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा: - संपूर्ण जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावणे सुरू आहे. ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनाक्रोश आहे मा. अधीक्षक अभियंता गिरी साहेब यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. आझाद समाज पार्टीच्या शंका कुशंकावर अधीक्षक अभियंतायांनी प्रकाश टाकला सदर निर्णय हा केंद्र शासनाने तीन वर्ष अगोदर घेतला असल्यामुळे आमच्या नाईलाज आहे असे सांगितले महाराष्ट्र शासनाने सुद्धा धोरणात्मक बदल करायला हवा असा आग्रह पक्षाच्या वतीने करण्यातआला.
सदर स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये सामान्य लोकांमध्ये आक्रोश आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर वेगवान धावतात, त्यामध्ये जास्त इलेक्ट्रिक बिल येण्याची शक्यता आहे व त्या इलेक्ट्रिक मीटरचे 12000 रुपये सामान्य माणसालाच टप्प्याटप्प्याने देणे आहे. सोबतच प्रीपेड रिचार्ज संपला तर इलेक्ट्रिक बंद होईल. अनेक सामान्य माणसांना दहा दहा पंधरा हजार रुपये बिल येत आहे अशा अनेक शंका कुशंका सामान्य माणसाच्या मनामध्ये आहेत त्यामुळेच स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यासाठी अनेक कुटुंब विरोध करत आहेत काही नोडल एजन्सी ठेकेदार जबरदस्ती घरी कोणी नसताना स्मार्ट मीटर लावत आहेत जे की एका ग्राहकाचे जे अधिकार आहेत त्याचा हनन करणे आहे.
स्मार्ट मीटर लावणे ऐच्छिक करावे ज्यांना वाटते त्यांच्याकडून लेखी घेऊन सदर मीटर लावण्यात यावे म्हणून आझाद समाज पार्टी आपणास विनंती करत आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याच्या कार्यवाहीला थांबविण्यात यावी जर ही सामान्य जनतेची मागणी पूर्ण होत नसेल तर आम्हाला सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन मोठा आंदोलन करण्याची गरज पडेल त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनाची राहील असा इशारा अधीक्षक अभियंता यांना देण्यात आला. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आजाद समाज पार्टी कांशीराम तर्फे जन आक्रोश आंदोलन घेण्यात येईल त्याची सूचना प्रशासनाला देण्यात आली.
शिष्टमंडळामध्ये विदर्भ सचिव ग्यानचंद्र जांभुळकर, गोंदिया जिल्हा प्रभारी राजेश मडामे, जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार, जिल्हा महासचिव अश्विन गोस्वामी, जिल्हा सचिव अमोल भिवगडे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उकणकर, राजेश गोस्वामी जिल्हा सचिव डॉ रवींद्र जनबंधू, आणि सदस्य मनोज उईके, त्रिरत्न गोस्वामी सदस्य जास्त जास्ती संख्येने उपस्थित होते.
0 Response to "जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर लावणे थांबवा आझाद समाज पक्ष, जनआंदोलनाचा इशारा."
एक टिप्पणी भेजें