अन्न नागरी पुरवठा अधिकारी/ कर्मचारी संघटना भंडारा जिल्हाध्यक्षपदी पोचीराम कापडे यांची नियुक्ती
मंगलवार, 19 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- येथील तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी पोचीराम
कापडे यांची भंडारा जिल्हा अन्न व नागरी पुरवठा अधिकारी /कर्मचारी संघटनेच्या भंडारा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,अन्न नागरी पुरवठा अधिकारी/ कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत भंडारा जिल्हा कार्यकारणीचे गठन सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व धान्य खरेदी अधिकारी सुहास टोंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय भंडारा येथे घेण्यात आली. त्या सभेत सर्वानुमते भंडारा तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा निरीक्षण अधिकारी पोचीराम कापडे यांची सर्वानुमते भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी -अर्चना सहारे ,सचिव- सागर सरसोळे ,सरचिटणीस राहुल कदम, कोषाध्यक्ष प्रवीण बडोले, सहकोषाध्यक्ष चंद्रशेखर नंदेश्वर ,प्रसिद्धी प्रमुख भूपेंद्र वालदे, निहाल गणवीर ,संघटक विनय कच्छवाह ,संघटक विनायक नंदनवार ,तर सदस्यपदी दीपक चौधरी, रक्षित तिरपुडे, मीनाक्षी दुर्गे ,जई सोनटक्के ,राहुल कांबळे, यांची एक मताने निवड करण्यात आली. यावेळी राज्य उपाध्यक्ष रतनलाल ठाकरे मुख्य समन्वयक रोशन कापसे, सहसरचिटणीस अतीस जाधव उपस्थित होते.
भंडारा जिल्हा अन्न व नागरी पुरवठा अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पोचीराम कापडे यांची निवड झाल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
0 Response to "अन्न नागरी पुरवठा अधिकारी/ कर्मचारी संघटना भंडारा जिल्हाध्यक्षपदी पोचीराम कापडे यांची नियुक्ती "
एक टिप्पणी भेजें