-->
साकोलीत प्रथमच सुलभ शौचालये जनतेसाठी सुरू

साकोलीत प्रथमच सुलभ शौचालये जनतेसाठी सुरू

• कर्तव्यदक्ष सीओ वासेकर यांचा पुढाकार ; स्थानिक मिडीयाने लक्ष वेधले 

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- साकोली सेंदूरवाफा ही २०१७ ला नगरपरिषद झाल्यापासून आजपर्यंत कोणताही मुख्याधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांनी शहरात सुलभ शौचालयाचे स्वप्न पाहिले नाही. जनता नेहमी तलावात उघड्यावर शौचाला जात होते. ही बाब सन २०२० पासून स्थानिक "साकोली मिडीया" या व्हॉट्सॲप समुहाने याची मालिकाच लावली. आणि याची दखल सीओ मंगेश वासेकर यांनी घेतली. व शहरात सुसज्ज दोन सुलभ शौचालये निर्माण झाली. याचे ( गुरूवार २८ ऑगस्ट ) ला हे दोन्ही सार्वजनिक शौचालय जनतेसाठी खुले करण्यात आले ही शहरासाठी गौरवाची बाब. 
               ब्रिटिशकालीन राजवटापासून मुख्य तहसिल शहर साकोलीत आजपर्यंत सुलभ शौचालय नव्हते. बाहेरगावाहून अतिथी व पाहुणे विविध स्थळी महामार्गावर थांबून येथे "फ्रेश" होण्यासाठी सुलभ शौचालये विचारीत होते. पण जनता काय सांगणार.? याने एक जूने तहसील शहराची बदनामी झाली होती. याचीच वृत्त मालिका "साकोली मिडीया" या समुहाने सुरू केली. सन २०२२ ला आलेले मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी या "भन्नाट" शब्दांच्या वृत्तांची अखेर दखल घेतली व नगरपरिषद साकोली सेंदूरवाफा शहरातील सार्वजनिक शौचाये नागझिरा रोड व एकोडी रोड लगत गुजरी या ठिकाणी असे दोन सार्वजनिक शौचालय तयार करण्यात आले आहे. सदर दोन्ही शौचालये हे सर्व सोयीयुक्त असून ते चालविण्याकरिता नगर परिषद साकोली सेंदूरवाफा यांनी सुलभ इंटरनेशनल सोशल सर्विस ऑर्गनायझेशन या संस्थेशी करार केलेला आहे. दोन्ही शौचालये पैसे द्या व वापरा ( पे एन्ड युझ ) तत्वावर संस्थेमार्फत चालविले जाणार असून काल २८ ऑगस्टला नागरिकांना वापरण्याकरिता सुरु करण्यात आले आहे. या कर्तव्यदक्ष सीओ मंगेश वासेकर यांनी अखेर हे करून दाखविले याबाबत शहरातील जागरूक जनतेने साकोली मिडीया सोबतच नगरपरिषदेचे मनापासून स्वागत करीत आभार व्यक्त केले आहे.

0 Response to "साकोलीत प्रथमच सुलभ शौचालये जनतेसाठी सुरू "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article