स्वतंत्र दिनानिमित्त लाखांदूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र सरांडी (बु) येथे एक झाड मां के नाम उपक्रम
शनिवार, 16 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- प्राथमिक आरोग्य केंद्र सरांडी येथे जिल्हा परिषद सदस्य रसिकाताई रंगारी यांच्या उपस्थितीत ७९ वा स्वातंत्र्य दीन साजरा करण्यात आला, तसेच अवयदान आणि तंबाखू मुक्त भारत ची शपथ घेण्यात आली , जेणेकरून भावी पिढीला वाईट सवई पासून दुर राहणार तसेच अवयव दान सर्वात श्रेष्ठ दान , याबद्दल लोकांना जनजागृती करण्यात आली , तसेच आज स्वतंत्र दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले ,एक झाड मां के नाम कार्यक्रम राबविण्यात आला झाडे लावा आणि झाडे जगवा हा मूळ मंत्र देउन नागरीकांना महीती देण्यात आली , त्यावेळी उपस्थित जिल्हा परीषद सदस्य रसिका ताई रंगारी, प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. बनसोड सर,वैद्यकिय अधिकारी डॉ नखाते सर, समूदाय आरोग्य अधिकारी डॉ पटले, निखील रंगारी, आरोग्य सहाय्यक श्री गजभिये, आरोग्य सहाय्यिका सिंग सिस्टर , एनसीडी पर्यवेक्षीका मधू सिस्टर, परिचर आशिष जी,आरोग्य कर्मचारी व अधिकारी हजर होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते
0 Response to "स्वतंत्र दिनानिमित्त लाखांदूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र सरांडी (बु) येथे एक झाड मां के नाम उपक्रम "
एक टिप्पणी भेजें