जिद्द चिकाटी मेहनत घेतली तर यश प्राप्त होतोच - आमदार राजू कारेमोरे
रविवार, 31 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
मोहाडी :- स्पर्धेत टीकायचे असेल तर युवकांन्ही जिद्द चिकाटी, मेहनत केल्याशिवाय यश प्राप्त करता येऊ शकणार नाहीं, असे स्पर्धेच्या उदघाट्न स्थानावरूनआमदार राजूभाऊ कारेमोरे यांही प्रतिपादन केले. मोहाडी तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळच्या वतीने म्यॅरेथान भव्य रनिंग स्पर्धेचे आयोजन 31 ऑगस्ट ला अकाळी 8 वाजता करण्यात आले होते, कार्यक्रम उदघाटक म्हणून तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार राजूभाऊ कारेमोरे होते तर, सहउदघाटक, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वडेगाव सरपंच ईश्वर माटे, पोलीस पाटील माटे मॅडम,सामाजिक कार्यकर्ते नरेन भोयर, सुनील गराडे, महेश बुधे,आश्वले, श्रीधत बांते, पत्रकार रेहपाडे, अमोल भुते, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते,
स्पर्धेत नागपूर, तिरोडा, भंडारा येथील युवकांही मोठ्या संख्येत भाग घेतला, त्यात प्रथम क्रमांक गौरव खोडतकर नागपूर यांही पटकविले तर द्वितीय रोहित पटले तिरोडा यांही तर तृतीय पुरस्कार अजित उके सुरेवाडा यांही प्राप्त केले, तर मुलीमधून वैशालीताई वंजारी डोंगरगाव यान्हा प्रोत्साहन पारितोषिक मा आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
0 Response to "जिद्द चिकाटी मेहनत घेतली तर यश प्राप्त होतोच - आमदार राजू कारेमोरे "
एक टिप्पणी भेजें