ओबीसी च्या आरक्षणातून कुणालाही आरक्षण देऊ नये - मा.खा. डॉ. अशोकजी नेते.
रविवार, 31 अगस्त 2025
Comment
• ओबीसी न्याय हक्कांसाठी साखळी उपोषणाला मा.खा.डॉ.नेते यांच्यासह गडचिरोली शिष्टमंडळाची उपस्थित.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी नागपूर येथील संविधान चौकात शनिवार, दि. ३० ऑगस्टपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी या साखळी उपोषण स्थळी गडचिरोली जिल्ह्यातील भाजप व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. श्री. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली भेट देऊन उपस्थित राहिले.
या प्रसंगी डॉ. नेते यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्याशी सविस्तर चर्चा करत ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी आपला सक्रिय पाठींबा जाहीर केला. यावेळी ते म्हणाले,
"ओबीसी समाजाचे आरक्षण ही पिढ्यान् पिढ्यांची लढाई व संघर्षाचे फलित आहे. या आरक्षणात कुणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कुणालाही ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण देता कामा नये. आम्ही गडचिरोलीमध्येही आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन केले. ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी आम्ही एकदिलाने उभे राहणार आहोत. हा लढा एकसंघ राहूनच यशस्वी होणार आहे."आम्ही ओबीसी समाजाच्या हितासाठी पाठीशी आहोत.
गडचिरोलीतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवित, "ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आमचा पूर्ण ताकदीने पाठिंबा आहे," असे स्पष्टपणे सांगितले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, माजी जिल्हाध्यक्ष (ओबीसी मोर्चा) अनिल पोहनकर, प्रा. शेषराव येलेकर, आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष मेघश्याम घुटके, प्रा. चिकटे सर, रत्नदीप म्हशाखेत्री, गणेश दहेलकर, सचिन भुसारी,भाविक आभारे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी भाजप गडचिरोली एकदिलाने लढणार असल्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त झाला.
0 Response to "ओबीसी च्या आरक्षणातून कुणालाही आरक्षण देऊ नये - मा.खा. डॉ. अशोकजी नेते."
एक टिप्पणी भेजें