उद्यापासून दोन दिवस वडसा येथे "पोळा रिट्रीट २०२५"
गुरुवार, 21 अगस्त 2025
Comment
• मद्यपिडीतांसाठी "अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस" ची नशामुक्ती कार्यशाळा ; भंडारा गोंदिया जिल्ह्यातीलही जातील बांधव •
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जागतिक स्तरावरील "अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस" या संघटनेत आज भंडारा गोंदिया जिल्ह्यातील हजारो मद्यसक्त बांधव कायम मद्यमुक्त होऊन सुखी समाधानी जीवनाचा आनंद घेत आहेत. पण पोळा मारबद या सणाला विषारी घोट "दारू" कडे ते आकर्षित होऊ नये. या बांधवांच्या सहवासात कळपात असावे. यासाठी आत्मसमर्पण आंतरसमुह भंडारा गोंदिया गडचिरोली व ब्रम्हपुरी परीसर आंतरसमुह यांच्या संयुक्त विद्यमाने शुक. २२ आणि शनि. २३ ऑगस्ट असे दोन दिवस "वडसा पोळा रिट्रीट - २०२५" चे अभिनव आयोजन नगरपरिषद सभागृह देसाईगंज येथे करण्यात आले आहे. येथे दिल्ली, पुणे, ठाणे, पनवेल, नागपूर वरून मार्गदर्शनासाठी अनुभवी बांधवांचे आगमन होणार आहे.
अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस आत्मसमर्पण आंतरसमुह भंडारा गोंदिया गडचिरोली व ब्रम्हपुरी परीसर आंतरसमुह वतीने शुक्रवार २२ ऑगस्ट सायं. ५ पासून "नम्रता आणि जबाबदारी" या थीमवर "पोळा रिट्रीट" चे दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात पागलपन, मृत्यू की सुधारणा, मी आणि माझ्यातील बदल, नशा करतोय जीवन नाश, असुरक्षित लैंगिक संबंध, दुहेरी व्यक्तीमत्व, सात्विक जीवनाच्या पलिकडे, एए ने माझ्या जीवनात आणलेला कृतीमय बदल, मी जबाबदार आहे, एए मधे आल्यावर मी कसा आहे, अश्या विविध विषयांवर मद्यसक्त जीवनातील आपले कटू अनुभव कथन करण्यासाठी दिल्ली, पुणे, पनवेल, नागपूर, गुजरात, मध्यप्रदेश येथून अनुभवी "अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस" बांधव येत आहेत. हे सत्र शनिवार २३ ऑगस्ट पर्यंत चालणार असून या "पोळा रिट्रीट २०२५" या नशामुक्ती कार्यशाळेला भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून सुमारे ३५० ते ४०० बांधवांची नोंदणी झाली आहे. मद्यपिडीतांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या व्यसनमुक्तीच्या अभिनव कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन "पोळा रिट्रीट २०२५" च्या आयोजकांनी केलेले आहे.
0 Response to "उद्यापासून दोन दिवस वडसा येथे "पोळा रिट्रीट २०२५""
एक टिप्पणी भेजें