जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मचरणा येथे तान्हा पोळा उत्सव.
गुरुवार, 21 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, मचारना येथे तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी छोटेखानी नंदीबैल आकर्षक सजवून आणले तसेच शेतकरी व पारंपारिक वेशभूषा परिधान करून सणाला विशेष रंगत आणली. मुलींनी लुगडा-साडी तर मुलांनी धोतर अशा पोशाखात सहभाग नोंदविला.
बैलपोळा हा पारंपरिक सण विद्यार्थ्यांना अनुभवता यावा, त्यांना बैलाविषयीची जाणीव व त्याचे योगदान समजावे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक वर्गातून दोन विजेते क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे तर सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गोड जेवण देण्यात आले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सरपंच अचलाताई फटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोमेश्वरजी कातोरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदेशजी लांजेवार, महेंद्रजी लुटे, तसेच पालक खुशालजी लांजेवार, ज्ञानेश्वरजी लांजेवार, यशवंतजी पगाडे, रविकांतजी लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुभाषजी काळे, सहाय्यक शिक्षक विजयजी चेटुले, श्रीमती मेश्राम मॅडम, कुमारी कुथे मॅडम व लांडगे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाषजी काळे सर यांनी केले, सूत्रसंचालन भीष्म लांडगे यांनी केले तर आभार विजयजी चेटुले सरांनी मानले.
0 Response to "जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मचरणा येथे तान्हा पोळा उत्सव."
एक टिप्पणी भेजें