-->

Happy Diwali

Happy Diwali
रहदारी रोडवरील खाजगी साहित्य तातडीने हटवा.साकोलीत सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचीच नगरपरिषदेला तक्रार

रहदारी रोडवरील खाजगी साहित्य तातडीने हटवा.साकोलीत सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचीच नगरपरिषदेला तक्रार



• तक्रारीची प्रत नायब तहसीलदारांनी सर्वप्रथम आणून दिली महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्षांकडे 

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली प्रभागातील रहदारी रोडावर बांधकाम साहित्य ठेवल्याने रहदारीस अडथळा होत आहे. तातडीने खाजगी साहित्य हटविण्याची मागणी येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदारांनीच नगरपरिषद मुख्याधिकारी यांना केलेली असून एका नायब तहसीलदारांच्या तक्रारीवर येथील कर्तव्यदक्ष सीओ मंगेश वासेकर यांची यावर काय एक्शन कारवाई असेल याकडे जनतेचे लक्ष वेधून आहे. याबाद जागरूक एका सेवानिवृत्त नायब तहसीलदारांनी या तक्रारीची प्रत जनहितार्थ प्रसारण करीता महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांकडे आणून देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याची मागणी केली आहे.
            सविस्तर की, शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर, पंचशील वार्ड येथील नगरपरिषद शासकीय सिमेंट रस्त्यावर गैरअर्जदार गोविल चंदन टेंभुर्णे यांनी आपल्या घर बांधकामांचे साहित्य गिट्टी, वाळू, विटा हे रोडवरच ठेवले. याने जनतेचा चारचाकी, दूचाकी मार्गावर भयंकर अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने या साहित्यांमधे सरपटणारे प्राणी शिरून जनतेस धोका निर्माण झाला आहे. येता जाताना जनतेला फार त्रास होत असून शासकीय नगरपरिषद सिमेंट रोडवरील हे खाजगी बांधकामाचे साहित्य तातडीने हटविण्याची तक्रार येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार मुकूंद खवसकर यांनी ( मंगळ. ०५ ऑगस्ट ) ला लेखी तक्रार नगरपरिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना दिली आहे. आता या प्रकरणी एका नायब तहसीलदारांच्याच तक्रार मागणीवर "अतिक्रमण हटाव" मोहिमेतील एक्शनबाज सीओ मंगेश वासेकर हे याप्रकरणी काय एक्शन कारवाईची तरतूद करतील याकडे प्रभागातील जनतेचे विशेष लक्ष केंद्रित आहे हे उल्लेखनीय.

0 Response to "रहदारी रोडवरील खाजगी साहित्य तातडीने हटवा.साकोलीत सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचीच नगरपरिषदेला तक्रार "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article