धापेवाडा परिसरात वीज पडून आई-बालकाचा दुर्दैवी मृत्यू
गुरुवार, 28 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहिक जनता की आवाज"
धापेवाडा :- ता. सावनेर , 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 3:15 वाजता, शेतामध्ये काम करत असताना वीज पडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात वंदू प्रकाश पाटील, त्यांच्या मुलगा ओम प्रकाश पाटील आणि निर्मला रामचंद्र पराते यांचा समावेश आहे. ही घटना त्यांच्या कुटुंबासाठी प्रचंड धक्कादायक ठरली आहे, कारण आता या कुटुंबात फक्त 16 वर्षांची मुलगी राहिलेली आहे.
घटना घडताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे, अनुग्रह तिडके, सुमित भाऊ गमे व जितेंद्र भाऊ कोल्हे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून मृतदेह सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
परिसरातील लोक या दुर्दैवी घटनेने भावविभोर आहेत. स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकरी व नागरिकांना पावसाळ्यात वीजेच्या धोक्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
0 Response to "धापेवाडा परिसरात वीज पडून आई-बालकाचा दुर्दैवी मृत्यू"
एक टिप्पणी भेजें